शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटीत अतिरेकी कारवायांचे धागेदोरे !

By admin | Updated: September 24, 2016 02:15 IST

उरणमध्ये अतिरेकी शिरल्याच्या चर्चेने देशभर खळबळ उडाली असून नवी मुंबईची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली आहे.

नामदेव मोरे,नवी मुंबई- उरणमध्ये अतिरेकी शिरल्याच्या चर्चेने देशभर खळबळ उडाली असून नवी मुंबईची सुरक्षा पुन्हा ऐरणीवर आली आहे. हिजबुल मुजाहिदीनचा अतिरेकी फारूख नायकूसह अनेकांना येथून अटक झाली आहे. मुंबई व गुजरात बॉम्बस्फोटातील कारही नवी मुंबईतून चोरी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. रिलायन्सचे मुख्यालय, जेएनपीटी व ओएनजीसीमुळे या परिसराला महत्त्व असून येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशातील सर्वात वेगाने विकसित होणारे शहर म्हणून नवी मुंबई, पनवेल, उरण परिसराची ओळख आहे. जगातील प्रमुख बंदरांमध्ये समावेश असलेले जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट उरणमध्ये आहे. याच परिसरामध्ये ओएनजीसीचा मुख्य प्रकल्प आहे. अंबानी समूहाचे मुख्यालय ठाणे बेलापूर एमआयडीसीमध्ये आहे. बंगळुरूनंतर सर्वात मोठे आयटी हब म्हणून नवी मुंबईची ओळख आहे. याशिवाय अनेक महत्त्वाचे व्यवसाय या परिसरात असल्यामुळेच घातपाती कारवाया करणाऱ्यांनीही या परिसरावर लक्ष केंद्रित केले आहे. जानेवारी २०१३ मध्ये मुंबई एटीएसने हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित असलेल्या फारूख नायकू व मोहम्मद तालुकादार या दोघांना अटक केली होती. अनेक वेळा पाक व्याप्त काश्मीरमध्ये जावून आलेला व बनावट नोटांसह अमली पदार्थांची तस्करीचा व्यवसाय करत होता. नवी मुंबईतील एपीएमसीच्या मसाला मार्केटमध्ये एक वर्ष तो मसाला विक्रीचा व्यवसाय करत असल्याचे तपासात निदर्शनास आले होते. याशिवाय अनेक वेळा मुंबई बाजार समितीमध्ये अतिरेक्यांचे वास्तव्य असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. देशातील अनेक घातपाती कारवायांचे थेट संबंध नवी मुंबईशी असल्याचेही तपासात अनेक वेळा निदर्शनास आले होते. २००८ मध्ये अहमदाबादमध्ये भीषण बॉम्बस्फोट झाला होता. त्या बॉम्बस्फोटामध्ये वापरण्यात आलेल्या दोन्हीही वॅगनआर कार नवी मुंबईमधून चोरी झाल्या होत्या. या प्रकरणी एका भंगार व्यावसायिकास अटकही झाली होती. याशिवाय जुलै २०११ मध्ये दादरमध्ये कारमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्या स्फोटासाठी वापरण्यात आलेली कार एमएच ४३ ए ९३८४ ही नवी मुंबईमधून चोरी झाली होती. जुलै २०१६ मध्ये इसिसशी संबंध असलेल्या एका तरूणास केरळ पोलिसांनी नवी मुंबईतून अटक केली आहे. देशातील तरूणांना इसिसमध्ये जाण्यासाठी तो प्रवृत्त करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. कर्नाळा अभयारण्यामध्ये इसिस तरूणांना प्रशिक्षण देत असल्याचेही उघड झाले होते. नवी मुंबईमध्ये अतिरेकी कारवायांशी संबंधित अनेक घटनांचे धागेदोरे सापडू लागले आहेत. यामुळे भविष्यात एखादी घातपाती कारवाई होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. यामुळे पोलिसांसह सर्वच यंत्रणांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असून सुरक्षा व्यवस्थेमध्ये अत्याधुनिक साधनांचा वापर करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. >जुलै २०१६ केरळ पोलिसांनी इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून एका तरूणास नवी मुंबईमधून अटक केली. तरूणांना इसिसमध्ये जाण्यासाठी तो प्रवृत्त करत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पण्ण झाले होते. जानेवारी २०१३हिजबुल मुजाहिदीनचे अतिरेकी फारूख नायकू व मोहम्मद तालुकदार यांना मुंबईमधील गेस्ट हाऊसमधून दहशतवादविरोधी पथकाने अटक केली. फारूख हा मुुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मसाला मार्केटमध्ये मसाल्याचा व्यापारी असल्याचे सांगून एक वर्षापासून रहात होता. वास्तविक बनावटा नोटा व अमली पदार्थांचा व्यापार करत होता. २००१ पासून भारत - पाक सीमा तीन वेळा पारकरून पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेला होता. जुलै २०११दादर बसस्टॉपवर तीन बाँबस्फोट यामध्ये वापरण्यात आलेली एमएच ४३ ए ९३८४ ही कार वाशीतील रहिवाशाची होती. वाराणसी स्फोट २०१०वाराणसी स्फोट इंडियन मुजाहिदीनच्या अतिरेक्यांनी वाशी सेक्टर १७ मधील तरूणाचा मेल हॅक करून मेल पाठविला होता. यामुळे अतिरेकी संघटनेशी संबंधित असणाऱ्यांनी या परिसरात अनेक वेळा वास्तव्य केल्याचे निदर्शनास आले होते. सप्टेंबर २००८अहमदाबाद बॉम्बस्फोटामध्ये वापरण्यात आलेली कार नवी मुंबईतून चोरी झाली होती. मुंबई पोलिसांनी पाच संशयित अतिरेक्यांना अटक केली होती. यामध्ये अफझल उस्मानी या तळोजातील भंगार व्यावसायिकाचा समावेश होता. त्याने चार कार चोरी केल्या होत्या. त्यामधील कारचाच गुजरात बाँबस्फोटासाठी वापर झाला होता. आॅगस्ट २००८अहमदाबाद बॉम्बस्फोट प्रकरणी अमेरिकन नागरिक केनिथ हेवूडचा मेल हॅक करून अतिरेक्यांनी बाँबस्फोट केल्याचा मेल पाठविला होता. पामबीच रोड सानपाडा येथील गुनीना इमारतीमध्ये हेवूडचे वास्तव्य होते. त्याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. डिसेंबर २०१५पनवेल परिसरातील एका महाविद्यालयातील प्राध्यापकाचा इसिसशी संबंध असल्याचे तपासात निदर्शनास आले होते. याप्रकरणी संबंधितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. >कर्नाळा परिसरात प्रशिक्षण इसिसमध्ये भरती होणाऱ्या तरूणांना कर्नाळा अभयारण्यामध्ये प्राथमिक प्रशिक्षण दिल्याचे २०१५ मध्ये निदर्शनास आले होते. यामुळे या परिसरात अतिरेकी कारवायांशी संबंधितांचा वावर असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले होते.>नवी मुंबईमधील महत्त्वाच्या गोष्टी सिडको कार्यक्षेत्रामध्ये १२० किलोमीटरचा खाडीकिनारा देशातील सर्वाधिक आयात - निर्यात होणारे जेएनपीटी बंदरउरणमधील ओएनजीसीचा प्रकल्पठाणे बेलापूर एमआयडीसीमध्ये रिलायन्सचे मुख्यालयपाताळगंगा एमआयडीसीमध्ये रिलायन्सचा प्रकल्पशिरवणेमध्ये पेट्रोल, डिझेल कंपनीचे तेलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित नवी मुंबई विमानतळ प्रकल्प >तपास कामात रहिवाशांचा अडथळापोलिसांच्या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये नागरिकांचा अडथळा केल्याचा प्रकार शुक्र वारी संध्याकाळी उरणमध्ये घडला. संशयित दहशतवाद्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून परिसरातील घरांची, इमारतींची, लॉज तसेच हॉटेलची तपासणी करण्यात येत आहे. दहशतवादी वेश बदलून लपल्याची शक्यता असल्याने गृहसंकुलांतही पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे. शुक्र वारी संध्याकाळी पोलिसांचे पथक बोरी पाखडी येथील क्लासिक पार्क इमारतीमध्ये तपासणीसाठी गेले असता रहिवाशांनी इमारतीचे फाटक बंद करून घेतले. त्यामुळे एनएसडीच्या जवानांना व पोलिसांना सुरक्षा भिंतीवरून उड्या टाकून सोसायटीत प्रवेश करावा लागला. त्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होते.