शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी म्हणजे मुंबई केंद्रशासित करण्याचे कारस्थान - उद्धव ठाकरे

By admin | Updated: December 14, 2015 08:45 IST

‘स्मार्ट सिटी’नामक जो काही आराखडा समोर आणला जातोय तो भांडवलदार, व्यापारी व बिल्डरधार्जिणा आहे असा आरोप उद्धव यांनी केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. १४ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी स्मार्ट सिटी योजनेवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल केला आहे. स्मार्ट सिटी हा मुंबईला केंद्रशासित करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ‘स्मार्ट’ सिटीच्या नावाखाली मुंबईसह देशभरातील अनेक शहरांत विकासाची झटपट क्रांती आणण्याचे ठरवले गेले आहे व त्यावरून राज्याराज्यांतील टीकेचे सूर वाढले आहेत. 

भूमिअधिग्रहण कायदा हा जसा शेतकर्‍यांच्या मुळावर उठला व शिवसेनेने विरोध करताच सारा देश त्या विरोधात उभा राहिला तसे काही ‘स्मार्ट’ सिटीच्या बाबतीत घडावे असे नाही, पण स्मार्ट सिटीच्या नावाखाली देशात मूठभर धनदांडग्यांचा नवा वसाहतवाद, संस्थानशाही निर्माण होणार असेल तर शिवसेना निदान ‘मुंबई’सारख्या शहरांना धनदांडग्यांची कायमस्वरूपी रखेल होऊ देणार नाही. 
देशातील शंभर शहरांची निवड दिल्लीतील नरेंद्र मोदी सरकारने केली व या शहरांचा संपूर्ण विकास म्हणे केंद्र सरकारच्या निगराणीखाली होणार. विकास कसा व काय करायचा हे फक्त केंद्र सरकार ठरविणार! मुंबईसारखी शहरे विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या हाती नव्हे तर केंद्राने स्थापन केलेल्या ‘खासगी’ कंपनीच्या हाती सुपूर्द केली जातील. ‘स्मार्ट सिटी’नामक जो काही आराखडा समोर आणला जातोय तो भांडवलदार, व्यापारी व बिल्डरधार्जिणा आहे असा आरोप उद्धव यांनी केला आहे. 
 
काय आहेत अग्रलेखातील मुद्दे 
मुंबईच्या विकासावर नियंत्रण ठेवणारे ‘स्पेशल पर्पज व्हेईकल बोर्ड’ निर्माण होईल व ही एकप्रकारे कॉर्पोरेट धर्तीची खासगी कंपनी असेल. अदानी, अंबानी, लोढा, गोयंका, मित्तल वगैरे उद्योगपती ज्या पद्धतीने आपल्या कंपन्यांत ‘डायरेक्टर’, ‘सीईओ’, ‘सीएमडी’ अशी इंग्रजी पदे देऊन कारभार करतात त्याच पद्धतीने मुंबईवर ‘सीईओ’ व ‘संचालक’ वगैरे नेमून कारभार चालवला जाईल व त्यावर केंद्राचे थेट नियंत्रण राहील. म्हणजे महाराष्ट्राची राजधानी ‘मुंबई’ ही एकप्रकारे केंद्रशासित किंवा केंद्राची वसाहत होईल व मुंबई महानगरपालिकेचा आज जो मर्दानी वाघ आहे त्याचे मांजर बनवले जाईल. या कंपनीत सरकारी अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी संचालक म्हणून असतील, पण त्याचबरोबर मुंबईस पैशाच्या जोरावर रखेल करू पाहणारे धनदांडगे लोकही संचालक म्हणून काम करतील. मुंबईचा विकास म्हणजे काय ते हेच लोक ठरवतील व सारा कारभार एकप्रकारे मुंबई महापालिकेकडून या खासगी ‘टोळी’च्या हातात जाईल. थोडक्यात मुंबईच्या ‘माथी’ नवे अंडरवर्ल्ड म्हणजे समांतर सरकारच मारण्याचा हा प्रकार आहे. ज्यांना सरळ मार्गाने मुंबईचे लचके तोडता आले नाहीत त्या लोकांनी पाठीमागून मुंबईवर वार करण्यासाठी ‘स्मार्ट सिटी’ची तलवार वापरली आहे काय? असा प्रश्‍न आता पडतोय. 
 
‘स्मार्ट सिटी’चा विनोद म्हणावा की हा महाराष्ट्राच्या राजधानीचा अपमान? ज्या मुंबईचे वार्षिक बजेट सुमारे ३४ हजार कोटी आहे त्या मुंबईला म्हणे केंद्र सरकार ‘स्मार्ट सिटी’ बनवण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे चिंचोके देईल. केंद्र सरकार ‘स्मार्ट सिटी’साठी असलेल्या ‘कंपनी’त दरवर्षी १०० कोटी असे पाच वर्षात ५०० कोटी देणार. म्हणजे एखाद्या ‘सम्राज्ञीस’ तिच्याच तिजोरीतून चोरलेली रक्कम भीक म्हणून देण्याचा हा प्रकार म्हणायला हवा. मुंबई केंद्राला वर्षाकाठी दीड लाख कोटींचा निधी ‘कर’रूपाने देत असते. यातला निदान २५ टक्के वाटा मुंबईला विकासासाठी म्हणून दिला तर हे शहरच काय संपूर्ण महाराष्ट्र देशात ‘स्मार्ट राज्य’ म्हणून आघाडीवर येईल 
 
गुजरातच्या मुख्यमंत्री मुंबईत येऊन येथील उद्योग पळवून नेण्याची भाषा करतात. मुंबई आज स्मार्ट आहे ती येथील उद्योग व कामगारांच्या श्रमामुळे. तेच ओरबाडून फक्त १०० कोटींच्या चिंचोक्यांवर तुम्ही मुंबई विकत घेताय? मुंबईतील ‘एअर इंडिया’ व केंद्र सरकारची इतर मुख्य कार्यालये अन्य राज्यांत हलवून या शहराचे महत्त्व कमी करण्याचा एकही मोका सध्याचे सरकार सोडत नाही. मुंबईस असे उघडे नागडे करून कोणत्या स्मार्ट सिटीचे स्वप्न साकार होणार आहे? मुंबईच्या लोकल प्रवासाचे हाल कुत्रा खात नाही. रोज १४ प्रवासी गर्दीमुळे पडून रेल्वे रूळावर मरत आहेत. तुमची बुलेट ट्रेन ‘मुंबई-अहमदाबाद’ धावायची तेव्हा धावेल. पण सध्या हे रोजचे मरण कमी करून लोकांना ‘स्मार्ट’ सुविधा देण्याची काय योजना आहे? नवी रेल्वे लाइन टाकायची तर रेल्वेच्या बाजूचे अतिक्रमण हटवावे लागेल. प्लॅटफॉर्मची उंची वाढवून ते सुरक्षित बनवावे लागतील. हे सर्व केले तरी मुंबईकर लोकल प्रवाशांचे जीवन स्मार्ट होईल व त्यांना सुखाचा श्‍वास घेता येईल, पण हा गुदमरलेला श्‍वास तसाच ठेवून ‘स्मार्ट’ सिटीचे ढोल वाजवणे थोतांड आहे! आपल्या राज्याचा आणि शहराचा विकास व्हावा असे कुणाला वाटणार नाही?