शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रिकामटेकडी मंडळी जातीय विष पेरत आहेत; नितीन गडकरी यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 01:44 IST

मुस्लिमांपुढे ‘इस्लाम खतरे में हैै’ची, तर दलितांना राज्यघटना बदलण्याची भीती दाखवली जात आहे़

नांदेड/परभणी : केंद आणि राज्यातील भाजपा सरकार विकासाचा अजेंडा राबवित असताना काही रिकामटेकडी मंडळी समाजात जातीय विष पेरण्याचे काम करत आहेत, अशी टीका केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोणाचेही नाव न घेता केली.लोहा येथे गुरुवारी तीन राष्ट्रीय महामार्गांचा भूमीपूजन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला़ यावेळी ते बोलत होते. गडकरी म्हणाले, सरकार विकास कामे करत असताना काही मंडळी जातीयवादाचे विष पसरवण्याचे प्रयत्न करत आहेत़ मुस्लिमांपुढे ‘इस्लाम खतरे में हैै’ची, तर दलितांना राज्यघटना बदलण्याची भीती दाखवली जात आहे़ मराठवाड्याला राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती़ मात्र त्याकाळात मराठवाड्याचा विकास होऊ शकला नाही़ लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागणे हे दुर्दैवी असल्याचे गडकरी म्हणाले.तेव्हा तुम्ही काय केले?परभणीत मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला़ त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, अरे नालायकांनो, १५ वर्षांत तुम्ही नीट वागला असतात तर या शेतकºयांची अशी अवस्था झाली असती का? ही कोणामुळे अवस्था झाली, याचं एकदातरी उत्तर तुम्ही दिले पाहिजे़ आम्हाला प्रश्न विचारण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले.मुख्यमंत्र्यांच्या भाषणात गोंधळपरभणी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाषण करीत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या महिलांनी शेतकºयांच्या आत्महत्येवरून गोंधळ घातला़ फडणवीस यांचे भाषण सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे या मुख्यमंत्र्यांच्या दिशेने धावत येत होत्या़ पाठोपाठ स्वाभिमानीच्या विद्यार्थी परिषदेच्या उपाध्यक्षा शर्मिला येवले याही मुख्यमंत्र्यांच्या दिशेने धावल्या़ काही अंतरावरच त्यांनाही पोलिसांनी रोखले़ शेतकरी स्वत: सरण रचून आत्महत्या करीत आहेत, तुम्ही मात्र इकडे उद्घाटन करीत फिरत आहात, अशा शब्दांत या महिलांनी आपले म्हणणे मांडले. त्यावर सभा संपल्यानंतर तुमचे म्हणणे ऐकून घेऊ, मला अशा घटनांची सवय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र तरीही आंदोलक ऐकायला तयार नसल्याने पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतले.

टॅग्स :Nitin Gadakriनितिन गडकरी