शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

झोपेत मेसेज करताय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2018 02:47 IST

पूर्वी लोक झोपेत चालत, आता लोक झोपेत मेसेज करतात. हा नवीनच आजार जगभरातल्या तारुण्याला ग्रासतो आहे आणि आपल्याला असा आजार आहे, हेच त्यांन मान्य नाही.

- निशांत महाजनझोझोपेत चालण्याचा आजार असतो, हे काही आपल्याला नवीन नाही; पण झोपेत मोबाइलवर मेसेज पाठवण्याचा आजार कुणाला होऊ शकतो का? त्या आजाराला म्हणतात ‘स्लीप टेक्सटिंग!’ म्हणजे झोपेत कुणाला तरी मेसेज पाठवणं, मेसेजला उत्तरं देणं, प्रसंगी आपण कुणाला काय मेसेज केला हे आठवणं आणि कधीकधी तर आपण रात्री-बेरात्री मेसेज केले हेही न आठवणं या साऱ्या प्रकाराला म्हणतात स्लीप टेक्सटिंग. तरुण मुलामुलींमध्ये या नव्या आजाराचं प्रमाण मोठं असलं तरी हा आजार तरुणांपुरताच मर्यादित नाही तर कार्पोरेट जगात काम करणाºया अनेकांना रात्री २ किंवा ३ वाजता मेसेज पाठवण्याचा आजार झालेला दिसतो. आणि आपल्याला हा आजार आहे हेदेखील ते मान्य करत नाहीत.मात्र जगभर सर्व जातीभेद ओलांडून हा आजार फोफावत असल्याचं झोप अभ्यासकांचं म्हणणं आहे. जर्नल आॅफ अमेरिकन कॉलेज हेल्थ या जर्नलने अलीकडेच एक अभ्यास प्रसिद्ध केला. त्यांनी फक्त कॉलेजात जाणाºया मुलांचा अभ्यास केला तर त्यात असं दिसतंय की, ४ पैकी १ तरुण झोपेत मेसेज पाठवतात आणि आपण असं काही करतो हे त्यांच्या गावीही नाही.या साºया प्रकाराला हे अभ्यासक नाइट लाइफ बिहेव्हिअर असं म्हणतात. त्या रात्रीच्या वर्तनात हे लोक मोबाइल पाहतात, सोशल मीडिया मेसेज तपासतात आणि प्रसंगी कुणाला काही कामाचे वा बिनकामाचे मेसेजही पाठवतात. अनेकदा असे मेसेज पाठवणं धोकादायक आहे. प्रसंगी लाजिरवाणंही होतं. वाट्टेल ते लिहिणं, शिवीगाळ, मनातलं ओकणं आणि व्याकरण, अपेक्षित नसलेले शब्द वापरणं हे सारं या झोपेत मेसेज पाठवणं प्रकारात घडतं.हे का घडतं, असं शोधलं तर असं दिसतं की जवळपास ९३ टक्के तरुण आपला मोबाइल उशाशीच घेऊन झोपतात. ( हा आकडा जगभरात मोबाइल वापरणाºया सर्वांसाठी खरा आहे असंही अभ्यासक सांगतात.) किमान दिवसाला १० तास मोबाइल अनेकांच्या शब्दश: हातात असतो. विशेष म्हणजे रात्री २ वाजता किंवा ३ वाजता, काहींना मध्यरात्रीही जाग येते आणि त्यावेळी ते सोशल मीडिया मेसेज तपासतात. प्रसंगी चर्चेत भाग घेतात. प्रसंगी पोस्ट करतात, मेसेज करतात. आणि मग पुन्हा झोपतात. जे लोक झोपेत मेसेज पाठवतात त्यापैकी ७२ टक्के लोकांना हे आठवतही नाही की आपण रात्री असा काही मेसेज केला होता.ते स्वत: तो मेसेज नाकारतात. पण यंत्र खोटं बोलत नाहीत, त्यामुळे रात्री-बेरात्री केलेल्या मेसेजचं रेकॉर्ड तयार होतंच. त्यामुळे त्यापायी जी काय शोभा होते, नाती खराब होतात, करिअरवर परिणाम व्हायचा तो होतोच.त्याहून वाईट परिणाम आणखी एका गोष्टीवर होतो. ती म्हणजे, झोप. अनेकांना निद्राविकार होतात. त्यांचं मनस्वास्थ्य बिघडतं. मूड जातात. काहींना नैराश्यही येतं. पचन संस्थेवर जागरणाचा परिणाम होतो. आणि पुढचा दिवस उदास, रटाळ जातो.अभ्यासक सांगतात की, झोपेत हात पोहोचणार नाही, उठून जावंसं वाटणार नाही इतपत लांब तरी मोबाइल ठेवा. कारण हा नवा आजार तुम्हाला घेरेल तेव्हा त्यातून बाहेर पडणं अधिक अवघड आहे.

टॅग्स :MobileमोबाइलMessengerमेसेंजर