शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

आभाळ फाटलंय, पण शिवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - मुख्यमंत्री

By admin | Updated: June 27, 2017 18:57 IST

असलेली वित्तीय तूट, आता कर्जमाफी यामुळे राज्य सरकारसाठी आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे. मात्र आम्ही हे फाटलेले

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 27 - राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा  बोजा पडणार आहे. आधीच असलेली वित्तीय तूट, आता कर्जमाफी यामुळे राज्य सरकारसाठी आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे.  मात्र आम्ही हे फाटलेले आभाळ शिवल्याशिवाय राहणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. शेतकरी संपामध्ये केंद्रस्थानी असलेल्या पुणतांब्यातील संपात सहभाग घेणाऱ्या 40 गावांतील शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केले. 
सह्याद्री अतिथीगृहात शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले. "आम्हाला कर्जमाफी करायचीच होती. त्यामुळेच ही कर्जमाफी झाली आहे. जर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचीच नसती तर सरकारने वेगवेगळी कारणे पुढे करून कर्जमाफी नाकारली असती." राज्य सरकारने अडचणीतल्या शेतकऱ्यांना मदत केलीच, पण नियमित कर्ज भरणाऱ्यांनाही मदत केली. इतर राज्यांनी असे केले नाही, असे मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन सांगितले. 
 आर्थिक स्थिती बघता 15 हजार कोटी रुपयांपलीकडे कर्जमाफी देण्यात येऊ नये, अशी सूचना वित्तविभागाने केली होती. मात्र सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केले. तसेच समृद्धी महामार्गाल विरोध करण्यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही. चर्चेतून मार्ग निघू शकतो, असा टोलाही त्यांनी लगावला.