शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

रोजगारयुक्त महाराष्ट्रासाठी ‘कौशल्य विकास’ कटिबद्ध

By admin | Updated: July 16, 2017 03:06 IST

राज्यातील तरुणांना उत्तम व दर्जेदार कुशल प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राज्यात राबविण्यात येत असून, आगामी काळात रोजगारयुक्त महाराष्ट्र घडावा, यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील तरुणांना उत्तम व दर्जेदार कुशल प्रशिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राज्यात राबविण्यात येत असून, आगामी काळात रोजगारयुक्त महाराष्ट्र घडावा, यासाठी कौशल्य विभाग कटिबद्ध आहे, अशी ग्वाही कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी निलंगेकर-पाटील यांनी दिली.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ‘जागतिक युवा कौशल्य दिना’निमित्त शनिवारी आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर बोलत होते. कार्यक्रमास कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, आमदार आशिष देशमुख विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता आयुक्त ई. रवींद्रन, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक अनिल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री निलंगेकर-पाटील म्हणाले की, भारत हा एकमेव देश असेल, जो प्रशिक्षित कुशल मनुष्यबळ निर्माण करणारा आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील युवकांना कुशल प्रशिक्षण देण्यावर आम्ही भर देत आहोत. कामगार व कौशल्य विकास यांचा मेळ घालून अधिकाधिक खासगी उद्योजकांनी राज्य शासनाबरोबर काम करावे, यासाठी शासन प्रयत्नशील आहे.‘मेक इन इंडिया’नंतर कौशल्य विकास विभागाचे ६२ सामंजस्य करार झाले असून, त्यापैकी ५८ करार कार्यन्वित झाले आहेत. ‘महामैत्री’ या पोर्टलद्वारे विविध क्षेत्रांतील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. युवकांना प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना विद्यावेतन आयटीआयचे आधुनिकीकरण, विविध उद्योगांमध्ये आवश्यक असणारे अभ्यासक्रमाबाबत कौशल्य विकास विभाग काम करीत असून, हे काम उत्तम असल्याची पावती पॅरिस येथे मिळालेल्या पुरस्काराने सिद्ध झाले आहे. पॅरिस येथे नुकत्याच झालेल्या ग्लोबल स्कील समीटमध्ये राज्याला उत्कृष्ट आयटीआयसाठी पुरस्कार मिळाला आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून १०० हून अधिक शासकीय आयटीआयचे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. आज महाराष्ट्रात आयटीआयला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, यावरून आयटीआयची गरज अबाधित असल्याचेही निलंगेकर-पाटील यांनी सांगितले. आगामी काळात भारतसुद्धा चीन, युरोपप्रमाणे कौशल्य विकासात अग्रेसर राहिल. पाठ्यपुस्तकाबरोबरच कौशल्याधारित शिक्षण विद्यार्थ्यांना हवे, म्हणून अप्रेंटिसशिप कायद्यात बदल करण्यात आला असून, याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असल्याचे राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील म्हणाले. या वेळी राज्यातील निवडक १२ औद्योगिक आस्थापनांना, संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते याच निधीचे वाटप करण्यात आले.