शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रॅगिंगप्रकरणी सहा विद्यार्थिनींना अटक, संचालकाविरुद्धही गुन्हे नोंदविण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 02:50 IST

शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतील (व्हीएमव्ही) मुलींच्या वसतिगृहात घडलेल्या रॅगिंगप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी सकाळी पाच मुलींना वसतिगृहातून अटक केली.

- गणेश देशमुख ।अमरावती : शासकीय विदर्भ ज्ञान-विज्ञान संस्थेतील (व्हीएमव्ही) मुलींच्या वसतिगृहात घडलेल्या रॅगिंगप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी सकाळी पाच मुलींना वसतिगृहातून अटक केली. अन्य एक मुलगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने सुटी होताच तिला अटक केली जाईल. महाराष्ट्र रॅगिंग कायदा १९९९ च्या कलम ४, ३४१, ३४२, ३५४ अन्वये गुन्हे दाखल करून ही कारवाई करण्यात आली.अत्यंत गंभीर प्रकरणात दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून संस्थेच्या संचालक अर्चना नेरकर यांच्याविरुद्ध तातडीने ‘निग्लिजन्स अ‍ॅक्ट’अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याचे आदेश अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना शनिवारी दिले.प्रवीण पोटे पाटील यांनी हे दुपारी शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेत गेले आणि तक्रारकर्त्या मुलींकडून सर्व प्रकारची माहिती घेतली. पीडित मुलींनी अनेक गंभीर आणि धक्कादायक मुद्दे पालकमंत्र्यांना सांगितले. त्यांनी रॅगिंग करणाºया मुलींशीही संवाद साधला. त्यानंतर त्यांनी संचालकांवर गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले.पालकमंत्री तेथून गेल्यानंतर अर्चना नेरकर संस्थेत पोहोचल्या. ‘लोकमत’च्या संबंधित बातमीदाराची पालकमंत्री आणि पोलीस आयुक्तांशी चर्चा होत असल्याचे फूटेज पाहून ‘तुम्ही सांगितले म्हणूनच हे सारे घडले,’ असा हास्यास्पद आरोप त्यांनी ‘लोकमत’वर केला.काय आहे प्रकरण?वसतिगृहातील एम.ए. द्वितीय वर्षाच्या मुलींनी २७ आॅगस्ट रोजी बी.एस्सी. द्वितीय वर्षाच्या मुलींना विवस्त्र करून त्यांचा मासिकधर्म अर्थात ऋतुस्राव तपासल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. याबाबत ४३ मुलींनी तक्रार करूनही ह्यअ‍ॅन्टि रॅगिंग कमिटीह्णने पाच दिवस पोलीस तक्रार नोंदविली नव्हती. उलटपक्षी तक्रारकर्त्या मुलींवर प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव आणला जात होता. रॅगिंगचा हा गंभीर प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर पोलिसांनी त्वरेने दखल घेतली. अ‍ॅन्टि रॅगिंग कमिटीचे प्रमुख विवेक मधुकर राऊत (४२) यांनी शुक्रवारी मध्यरात्री पोलिसांत तक्रार नोंदविली. शनिवारी पहाटे २.३० च्या सुमारास गाडगेनगर पोलिसांनी गुन्हे नोंदविले. शनिवारी पहाटे मुलींना अटक केली.

टॅग्स :Crimeगुन्हा