शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

सहा विद्यार्थीनींच्या शाळेला शिक्षण सचिवांची आकस्मिक भेट!

By admin | Updated: September 24, 2015 23:50 IST

दुर्गम गावात नंदकुमारांची गाडी; शिक्षणाची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न.

बुलडाणा : अतिशय दुर्गम गाव.. गावातील जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या अवघी ६ विद्यार्थीनींची.. दोन शिक्षक, त्यापैकी एक पूर्ण वेळ.. शिक्षण विभागाचे अधिकारीही सहसा ज्या शाळेकडे फिरकत नाहीत, अशा या दुर्लक्षित शाळेत साक्षात शिक्षण सचिव दाखल होणे, हा प्रसंग तसा दुर्मिळच. मातृतीर्थ सिंदखेडराजात गुरुवारी हे चित्र पहावयास मिळाले. राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार हे गुरूवारी औरंगाबाद येथून विदर्भात दाखल होताच, सिंदखेडराजा तालुक्यातील निमखेड गावातील शाळेला भेट देवून ग्रामीण भागातील शिक्षणाची स्थिती त्यांनी समजून घेतली. सिंदखेडराजा व शिवणी टाका यादरम्यान निमखेड हे दुर्गम असे गाव आहे. या गावात जिल्हा परिषदेची एक शाळा असून, शाळेच्या पटावर केवळ सहा मुली आहेत. या गावापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. शिक्षण सचिव नंदकुमार यांची पिवळ्या दिव्याची गाडी खाचखळगे चुकवत, सकाळी १0 वाजता गावात पोहचली. गावात येणारी ही पहिलीच दिव्याची गाडी. त्यामुळे ग्रामस्थ या गाडीमागे धावत शाळेजवळ पोहचले. शाळेला कुलूप होते. त्याचवेळी निमशिक्षक जाधव धावत-पळत शाळेवर पोहचले. नंदकुमार यांच्यासोबत जिल्हा शिक्षण विभागातील अधिकारी आणि तालुक्यातीलच दत्तापूर येथील शिक्षक विनोद ठाकरे, तसेच भोसा येथील शिक्षक शरद नागरे हे उपस्थित होते. नंदकुमार यांनी ग्रामस्थांना स्वत:चा परिचय देऊन, शाळेची चौकशी केली. अवघ्या सहा मुलींसाठी भरणारी ही शाळा बंद झाली तर काय होईल, याबाबत त्यांनी ग्रामस्थांचे मत जाणण्याचा प्रयत्न केला. शिक्षक दररोज येतात का, मुली नियमित शाळेत जातात का, या मुलींना दुसर्‍या शाळेत पाठविले तर चालेल का, अशा अनेक प्रश्नातून त्यांनी ग्रामस्थांची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न केला. राज्य शासन १0 पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाप्रत आली आहे. या पृष्ठभूमिवर दुर्गम भागातील कमी पटसंख्येच्या शाळांची प्रत्यक्ष पाहणी करुन ग्रामीण भागाची गरज जाणून घेण्याचा प्रयत्न शिक्षण सचिव करीत आहेत. त्यानंतर नंदकुमार यांनी मेहकर तालुक्यातील चिंचोली बोरे या शाळेला भेट दिली. त्यांनी येथील विद्यार्थ्यांना परिसर ज्ञानावर आधारीत प्रश्न विचारले. शिक्षकांशी संवाद साधून त्यांच्याही अडचणी समजून घेतल्या.