शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

सहा दरोडेखोरांना अटक, दोन फरार

By admin | Updated: December 27, 2014 23:53 IST

साखरखेर्डा स्टेट बँक रोकड लंपास प्रकरण : २५ लाखांची रोकड जप्त.

मेहकर (जि. बुलडाणा) : स्टेट बँकेची ३0 लाख रुपयांची रोकड पळवून नेणार्‍या सहा आरोपींना २७ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून २५ लाख रुपये व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. दरोडेखोरांमध्ये एका निलंबित पोलिसाचा समावेश आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेची रोकड नेणारी व्हॅन अडवून दरोडेखोरांनी ३0 लाख रुपये लंपास केल्याची घटना शुक्रवारला घडली होती. पोलिसांनी युद्धपातळीवर तपास मोहीम राबवून परिसराची नाकेबंदी केली होती. २६ डिसेंबर रोजी सायंकाळी या प्रकरणातील आरोपी लहू ऊर्फ लकी पंडित जाधव यास भुमराळा, चांगेफळ आणि वझर सरकटे शिवारातून पाठलाग करत पकडण्यात आले होते. त्यानंतर दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलीस अधीक्षक श्यामराव दिघावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेल्या सात पथकांनी रात्रभर भुमराळा, वझर सरकटे जंगलात पाळत ठेवली. दरम्यान, २७ डिसेंबर रोजी आकाश थेटे व सुदर्शन थेटे या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. जालना येथील निलंबित पोलीस कर्मचारी शिवाजी भागडे, बोक्या ऊर्फ गोविंद डोंगरे व ज्ञानेश्‍वर ऊर्फ बालाजी खरात या तीन आरोपींना नाशिक येथे शनिवारला सकाळी ६.३0 वाजेदरम्यान रेल्वे स्टेशनवरून गुन्हे अन्वेशन शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले, तर या प्रकरणातील मदन भागडे व त्याचा एक साथीदार असे दोन आरोपी मुंबईकडे फरार झाल्याची माहिती आहे. दरम्यान, भुमराळा जंगलातून पकडलेल्या आरोपींकडून पोलिसांनी २५ लाख रुपयांच्या रोकडसह इतर साहित्यही हस्तगत केले आहे.