शहरं
Join us  
Trending Stories
1
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
2
आता कोणत्या देशावर हल्ला करणार अमेरिका?; ८०० सैन्य अधिकाऱ्यांची अचानक बैठक, चर्चांना उधाण
3
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी-video
4
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीकडून 'ड्रामेबाज' पाकिस्तानी पंतप्रधानांची पोलखोल; कोण आहेत पेटल गहलोत?
5
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट
6
एक ओव्हर आणि मग गायब, फायनलपूर्वी हार्दिक पांड्याला झालं काय? टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
7
Corona Virus : बापरे! कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'ही' लक्षणं दिसताच सावधान
8
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
9
नवरात्री २०२५: कोकणस्थांकडे अष्टमीला असते उकडीच्या मुखवट्याची महालक्ष्मी; काय आहे वैशिष्ट्य?
10
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
11
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
12
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
13
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
14
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
15
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
16
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
17
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
18
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
19
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
20
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स

सहा. आयुक्तांची नव्याने निवड करण्याचा आदेश

By admin | Updated: December 2, 2015 02:36 IST

राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनात ‘सहायक आयुक्त (अन्न) व प्राधिकृत अधिकारी वर्ग-ए’ची १९ पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या वर्षभरात राबविलेली संपूर्ण निवड

मुंबई : राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनात ‘सहायक आयुक्त (अन्न) व प्राधिकृत अधिकारी वर्ग-ए’ची १९ पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गेल्या वर्षभरात राबविलेली संपूर्ण निवड प्रक्रिया महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट)ने रद्द केली आहे.लोकसेवा आयोगाने या पदांसाठी पुन्हा जाहिरात देण्यापासून संपूर्ण निवड प्रक्रिया नव्याने पार पाडावी आणि ती येत्या चार महिन्यांत पूर्ण करावी, असा आदेश ‘मॅट’चे उपाध्यक्ष राजीव अगरवाल व न्यायिक सदस्य आर.बी. मलिक यांच्या न्यायपीठाने सोमवारी दिला. आधीच्या निवड प्रक्रियेत निवड झालेल्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या असतील तर त्याही रद्द झाल्याचे, न्यायाधिकरणाने जाहीर केले.पुणे महानगरपालिकेतील एक अन्न सुरक्षा अधिकारी अजित शिवाजी भुजबळ यांनी केलेली याचिका मंजूर करून हा निकाल दिला गेला. आधीच्या जाहिरातीनुसार भुजबळ यांनी अर्जही केलेला नसल्याने ते निवड प्रक्रियेच्या विरोधात दाद मागू शकत नाहीत, हा आयोगाने घेतलेला आक्षेप ‘मॅट’ने अमान्य केला. विशेष म्हणजे न्यायाधिकरणापुढे राज्य सरकारने आयोगाच्या विरोधात व याचिकाकर्ते भुजबळ यांच्या बाजूने भूमिका घेतली.याआधी याच पदांच्या निवड प्रक्रियेसंबंधी बालाजी ए. शिंदे व इतर सात जणांनी ‘मॅट’कडे याचिका केली होती. त्यात न्यायाधिकरणाने गेल्या वर्षी १२ आॅगस्ट रोजी असा आदेश दिला होता की, आयोगाने नव्याने जाहिरात देऊन अथवा आधीच्या जाहिरातीचे शुद्धिपत्र प्रसिद्ध करून अन्न सुरक्षा व मानक नियमावलीनुसार या पदांसाठीचे सुधारित अर्हता त्यात समाविष्ट करावी. आयोगाने याचे पालन केले नाही म्हणून ‘मॅट’ने आधीची संपूर्ण निवड प्रक्रिया रद्द केली. आयोगाच्याच नियमांनुसार नोकरीसाठीची जाहिरात वृत्तपत्रांत प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. असे असूनही ‘मॅट’ने बालाजी शिंदे प्रकरणात आदेश दिल्यावर आयोगाने वृत्तपत्रांत शुुद्धिपत्र प्रसिद्ध न करता ते केवळ आपल्या वेबसाइटवर टाकले; शिवाय त्यांनी या सुधारित अर्हतेनुसार अर्ज करणे फक्त महाराष्ट्र सरकारच्या सेवेत असलेल्या अन्न सुरक्षा निरीक्षकांपुरते मर्यादित केले.या सुनावणीत याचिकाकर्ते भुजबळ यांच्यासाठी अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांनी, राज्य सरकारसाठी सरकारी वकील ए.जे. चौगुले यांनी तर लोकसेवा आयोगासाठी सरकारी वकील के.जे. गायकवाड यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)सहा हजार अर्जदारांना त्रासया १९ पदांसाठी आयोगाने आधीची जाहिरात गेल्या वर्षी १५ मार्च रोजी प्रसिद्ध केली होती. परीक्षेचे निकाल यंदा १६ एप्रिल रोजी जाहीर झाले. आॅगस्टमध्ये मुलाखती होऊन अंतिम निवड केली गेली. आधीच्या जाहिरातीनुसार ६.०६५ अर्जदारांनी अर्ज केले होते. आयोगाच्या चुकीमुळे या अर्जदारांना नव्या निवड प्रक्रियेच्या त्रासातून जावे लागणार आहे.आयोगाच्याच नियमांनुसार नोकरीसाठीची जाहिरात वृत्तपत्रांत प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. असे असूनही ‘मॅट’ने बालाजी शिंदे प्रकरणात आदेश दिल्यावर आयोगाने वृत्तपत्रांत शुुद्धिपत्र प्रसिद्ध न करता ते केवळ आपल्या वेबसाइटवर टाकले.