औरंगाबाद / बुलडाणा / जळगाव : नापिकीला कंटाळून राज्याच्या विविध भागांत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. फुलंब्रीतील वारेगाव येथील अशोक जाधव (३०) याने कर्जबाजारीपणातून रविवारी रात्री गळफास घेतला. त्याच्यावर ३६ हजार रुपये कर्ज आहे. शिवाय खासगी सावकाराकडूनही कर्ज घेतले आहे. खुलताबाद येथील हिरामण पवार (३५) याने आत्महत्या केली. बुलडाण्यातील देऊळगाव राजा तालुक्यात रामेश्वर जायभाये (३८) यांनी शेतीवर बँकेचे ४७ हजार रुपये कर्ज घेतले होते़ खर्चही निघू शकला नाही़ त्यामुळे त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़ विष्णू मोरे (३0) यांनी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली़ नापिकी कर्ज यामुळे आत्महत्या केली. जळगावातील शालीक अत्तरदे (५२) व सुकदेव पवार (५३) यांनीही आत्महत्या केल्या.
सहा शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By admin | Updated: October 6, 2015 02:33 IST