शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सहा शहरे होणार स्मार्ट

By admin | Updated: June 21, 2016 03:49 IST

केंद्र शासनाच्या स्मार्ट शहरांच्या यादीत राज्यातील दहा शहरांचा समावेश करण्यात आला होता. परंतु, केंद्रीय नगरविकास खात्याने राज्यातील पुणे आणि सोलापूर या दोन शहरांची पहिल्या फेरीत निवड केली

नारायण जाधव,  ठाणेकेंद्र शासनाच्या स्मार्ट शहरांच्या यादीत राज्यातील दहा शहरांचा समावेश करण्यात आला होता. परंतु, केंद्रीय नगरविकास खात्याने राज्यातील पुणे आणि सोलापूर या दोन शहरांची पहिल्या फेरीत निवड केली होती. आता राज्य शासनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर यापैकी ठाणे, कल्याण-डोंबिवलीला एमएमआरडीए तर नागपूर, नाशिक, अमरावती आणि औरंगाबाद या शहरांना २०१६-१७ वर्षापासून सिडकोच्या पैशातून स्मार्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या शहरांना केेंद्र शासनाऐवजी एमएमआरडीए आणि सिडकोकडून प्रत्येकी १०० कोटींचे अर्थसहाय्य देणार आहे. यातील ५० कोटी रूपये पहिल्या वर्षी देण्यात येणार आहेत. तर आर्थिक राजधानी मुंबई आणि नवी मुंबई या दोन महापालिका आर्थिकदृष्या सक्षम असल्याने त्यांनी स्वबळावर स्वत:ची स्मार्ट सिटी योजना राबवावी, असे निर्देश नगरविकास विभागाने दिले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेने आयोजित केलेल्या स्मार्ट सिटी परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेच्या दुसऱ्याच दिवशी शनिवारी नगरविकास विभागाने हा निर्णय घेतला आहे. यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आठ महापालिकांनीही १५ संचालक असलेली एसपीव्ही अर्थात विशेष हेतू कंपनी स्थापन करावी, यात संबधित महापालिकेचे ६, महाराष्ट्र शासनाचे ४, केद्र शासनाचा १ आणि दोन स्वतंत्र संचालकांचा समावेश करावा, असे याबाबतच्या आदेशात नगरविकास विभागाने म्हटले आहे. मात्र, महापालिकांनी नेमावयाच्या संचालकांमध्ये महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेता आणि विरोक्षी पक्ष नेत्यांसह संख्याबळानुसार उर्वरीत दोन संचालक नेमावेत असे निर्देश आहेत.विशेष हेतू कंपनी स्थापण्यासाठी केंद्राच्या निर्देशानुसार आवश्यक असलेल्या पाच लाख रूपयांच्या भाग भांडवलास मान्यता देण्यात आली आहे. मात्र, प्रकल्प राबवितांना राज्य शासन आणि महापालिकांचे भाग भांडवल समसमान ५० टक्के राहणार आहे. एखाद्या प्रकल्पासाठी कर्ज घेतल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबधित महापालिकांची राहणार असून ५० कोटींपेक्षा जास्त रक्कमेचा प्रकल्प राबवायचा झाल्यास त्यास केंद्र शासनाच्या उच्चाधिकार समितीची परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. या आठ शहरांसाठी नगरविकास विभागाने आठ वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शक म्हणून नेमले असून त्या त्या शहरांचे पोलीस आयुक्त आणि स्थानिक जिल्हधिऱ्यांचा समावेश असलेली उपसमिती त्यांना मदत करणार आहे.विशेष म्हणजे विशेष हेतू कंपनी विषयी शंका उपस्थित करून नवी मुंबई महापालिकेत सत्ताधारी राष्ट्रवादीने स्मार्ट सिटी स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा शिवसेना-भाजपाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या अधिकारात नवी मुंबईचा यात समावेश करण्याची मागणी केली होती. मात्र, केंद्राने राज्यातील केवळ पुणे आणि सोलापूरचीच निवड केली. आता पुन्हा विशेष हेतू कंपनीच्याच माध्यमातून स्व-खचाने नवी मुंबई महापालिकेस स्मार्ट सिटी विकसित करण्याचे आदेश नगरविकास विभागाने दिले आहेत. यामुळे तेथील राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.