शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

शिवडी-न्हावा-शेवा प्रकल्पासाठी चुरस, तीन टप्प्यांसाठी १० कंत्राटदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 02:14 IST

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात येणा-या शिवडी-न्हावा-शेवा या ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी कंत्राटदारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात येणा-या शिवडी-न्हावा-शेवा या ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी कंत्राटदारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पातील पहिल्या दोन टप्प्यांचे बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी चार तर तिस-या टप्प्याचे बांधकाम करण्यासाठी दोन कंत्राटदार असे एकूण १० कंत्राटदार अंतिमत: शर्यतीत आहेत, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली.मुंबईला जलद ट्रॅकवर नेऊ शकणाºया ट्रान्स हार्बर लिंकसाठी एकूण सतरा कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या होत्या. त्यापैकी दहा निविदा पात्र ठरल्या. शिवडी ते १०.३८ किलोमीटरच्या लांबीच्या पहिल्या टप्प्यासाठी ज्या चार कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या; यामध्ये देउ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड कन्ट्रक्शन आणि टाटा प्रोजेक्ट्स, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन आणि एस.के. इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन, आय.टी.डी. सिमेंटेशन इंडिया, सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर, इटालियन थाय डेव्हलपमेंट पब्लिक, सुमितोमो मित्सुई कन्स्ट्रक्शन आणि लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो इंडिया, आय.एच.आय. इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीमचा समावेश आहे.१०.३८ ते १८.१८७ किलोमीटर लांबीच्या दुसºया टप्प्यासाठीचार कंत्राटदारांनी निविदासादर केल्या. यामध्ये देउ इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन, टाटा प्रोजेक्ट्स, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन, एस.के. इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड कन्स्ट्रक्शन, आय.टी.डी. सिमेंटेशन इंडिया, सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर, इटालियन थाय डेव्हलपमेंट पब्लिक, सुमितोमो मित्सुई कन्स्ट्रक्शन, लार्सन अ‍ॅण्डटूब्रो आणि आय.एच.एम. इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम या कंत्राटदारांचा समावेश आहे.१८.१८७ किमी ते चिर्ले ३.६१३ किलोमीटर लांबीच्या तिसºया टप्प्यासाठी दोन कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या. यामध्ये आय.टी.डी. सिमेंटेशन इंडिया, ठाकूरइन्फ्रा प्रोजेक्ट्स, जे.एम. म्हात्रे इन्फ्रा आणि लार्सन अ‍ॅण्ड टूब्रोचा समावेश आहे. पात्र ठरलेल्या दहा निविदांचे मूल्यांकन केल्यानंतर जायकाच्या सहमतीने यशस्वी निविदाकार घोषित करण्यात येतील, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले.