शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणबळी कुटुंबीयाच्या घरच्या परिस्थितीचे वास्तव भीषण

By admin | Updated: September 20, 2016 03:47 IST

भूकबळी ठरलेल्या ईश्वर सवरा आणि सागर वाघ यांना व त्यांच्या कुटुंबियांना रोज भूक भागविण्याची भ्रांत पडत होती.

रविंद्र साळवे,

मोखाडा- भूकबळी ठरलेल्या ईश्वर सवरा आणि सागर वाघ यांना व त्यांच्या कुटुंबियांना रोज भूक भागविण्याची भ्रांत पडत होती. अनेकदा उपाशी पोटी रहावे लागत होते. असे भीषण वास्तव लोकमतने त्यांच्या घरी सात्वनासाठी भेट दिली असता. समोर आली आहे. घरात धान्यांचा कण नाही भांडी नाहीत अंथरूण, पांघरूण नाही, पुरेशी वस्त्रे नाही अशी स्थिती आहे.नामदेव सवरा म्हणाले की, रोज आम्ही उठतो ते आज पोटात दोन घास पडतील की नाही याच फिकीरीत कारण आमच्या हाताला रोजगार नाही. आधी तो शोधावा लागतो त्यात तो मिळाला तरी इतकी तुटपुंजी मजुरी मिळते की, त्यातून एक वेळी पोट कसे बसे भरावे असा प्रश्न असतो. आता सध्या हाताला कोणतेच कामे नाही. गवत कापणी करून काही दिवसांपासून आमचा उदरनिर्वाह सुरू आहे. तर आता कुणी गवत निंदणीचे कामे सांगतात हिच कामे करत आम्ही आमच्या मुलाबाळांना खाऊ घालत आहे ईश्वर गेल्याचे खूप दु:ख होत असून आता कृष्णा आणि सोनाली आणि पत्नी एवढाच आमचा परिवार उरला आहे. असे ते म्हणाले. ईश्वरची आई सुंदर हिने सागर गेल्या पासून अंगणवाडीत आहार दिला जात असल्याचे सांगितले. तोच आधी दिला गेला असता तर ईश्वर वाचला असता. कारण तो त्यापूर्वी कधी दिलाच जात नव्हता, असे सांगितले.यानंतर कळमवाडी येथील सागर वाघ या मृत बालकाच्या कुटुंबियांची परिस्थिती जाणून घेतली.त्याचे वडील शिवा म्हणाले की, आम्हाला घर नाही कुडाच्या झोपडीत आम्ही राहत आहोत. काम नसल्याने जगायच कसे हा आम्हला रोजच प्रश्न भेडसावतो. यामुळे आम्हाला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा शेतीचे कामे झाल्यानंतर आम्ही आमच्या मुलाबाळांसह स्थलांतरीत होतो. आम्हाला जॉबकार्डसुध्दा नव्हते, सागरचा मृत्यू झाल्यानंतर आम्हाला जॉबकार्ड दिले आहेत. सागर असतांना कधी कधीच अंगणवाडीतला आहार मिळायचा परंतु सागर गेल्याने या परिस्थितीत बदल झाला आहे. यामुळे सरकार आदिवासींचा जीव जाण्याची वाट पाहते काय असा प्रश्न उपस्थित केला.मुलगी नंदीती, पत्नी सीता असा आमचा परिवार आता उरला आहे, असे ते म्हणाले.मोखाडा ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ३०/३५ कुपोषित बालके दवाखान्यात दाखल झालेली आहेत, त्यांना एफ ७५, एफ १०० फूड दिले जात असून केळी अंडी दूध असा आहार दिला जात असून उपचार चालू असे लोकमतला सांगितले. त्यांच्या घरात कोणतीही चिज वस्तू नव्हती. अशी स्थितीत ते कसे जगत असतील असा प्रश्न कुणालाही पडावा अशी स्थिती होती. हे पाहून कोणाचेही हृदय द्रवेल असे वातावरण होते.