शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

चालत्या रेल्वेत बसणे गुन्हा नाही

By admin | Updated: July 17, 2017 20:46 IST

चालत्या रेल्वेगाडीत बसणे गुन्हा नाही असा खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात केला आहे.

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 17 : चालत्या रेल्वेगाडीत बसणे गुन्हा नाही असा खुलासा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात केला आहे.रेल्वे कायद्यातील कलम १५४ व १५६ मध्ये रेल्वेशी संबंधित फौजदारी कृतीसाठी शिक्षेची तरतूद आहे. कलम १५४ अनुसार रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात टाकणे व कलम १५६ अनुसार रेल्वेगाडीच्या छतावर, पायऱ्यांवर व इंजिनवर बसून प्रवास करणे गुन्हा आहे. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने चालत्या रेल्वेगाडीत बसणे फौजदारी कृतीमध्ये मोडत नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, चालत्या रेल्वेगाडीत बसताना खाली पडून मृत्यू किंवा गंभीर इजा झाल्यास पीडित प्रवासी भरपाई मिळण्यास पात्र असल्याचे सांगितले. कायद्यातील कलम १२३ (सी)(२) मध्ये दुर्दैवी घटनांची व्याख्या देण्यात आली आहे. त्या व्याख्येत मोडणाऱ्या घटनांतील पीडित प्रवाशाला भरपाई देण्यासाठी कलम १२४ (ए) मध्ये तरतूद आहे. परंतु, कलम १२४ (ए) (सी) अनुसार प्रवाशाने स्वत: फौजदारी कृती केल्यास तो भरपाईस अपात्र ठरतो. कलम १२३ (सी)(२) मधील व्याख्येत चालत्या रेल्वेगाडीत बसताना खाली पडण्याच्या घटनेचा समावेश नाही. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासन वि. प्रभाकरण प्रकरणावरील निर्णयात दुर्दैवी घटनांना व्यापक अर्थ दिला आहे. एखाद्या कलमातील तरतुदीचा अर्थ प्रशासन व पीडित या दोघांनाही मदत करणारा निघत असल्यास पीडितालाच झुकते माप दिले गेले पाहिजे असे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे. अन्यथा भारतासारख्या देशामध्ये असंख्य पीडित प्रवासी भरपाईपासून वंचित राहतील असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या निर्णयाच्या आधारे उच्च न्यायालयाने संबंधित पीडित प्रवाशाला भरपाईसाठी पात्र ठरविले.असे आहे मूळ प्रकरणशशिकांत नंदकिशोर ढगे (२१) हा तरुण २९ आॅगस्ट २०१० रोजी अधिकृत आरक्षण घेऊन रेल्वे प्रवास करीत होता. तो चंद्रपूर रेल्वेस्थानकावर टुथब्रश खरेदी करण्यासाठी उतरला. त्यावेळी जवळची सर्व दुकाने बंद होती. त्यामुळे तो थोडा लांब गेला. दरम्यान, रेल्वेगाडी सुरू झाली. चालत्या रेल्वेगाडीत बसण्याचा प्रयत्न करताना तो पाय घसरून खाली पडला. त्यामुळे त्याचा डावा पाय मांडीपासून कापावा लागला. त्याने भरपाई मिळण्यासाठी सुरुवातीला रेल्वे दावा न्यायाधिकरणात दावा दाखल केला होता. न्यायाधिकरणने हे प्रकरण दुर्दैवी घटनांच्या व्याख्येत मोडत नसल्याचे सांगून दावा खारीज केला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हे अपील मंजूर केले. कायद्यानुसार पीडिताने गुन्हा केला नसल्यामुळे तो भरपाईस पात्र असल्याचे न्यायालयाने सांगितले. तसेच, पीडिताला तीन महिन्यांमध्ये सात टक्के व्याजासह ४ लाख ८० हजार रुपये भरपाई देण्याचा आदेश दिला. पीडितातर्फे अ‍ॅड. अनिल बांबल यांनी बाजू मांडली.