शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
2
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
3
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
4
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
5
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
6
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
7
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
8
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
9
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
10
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
11
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
12
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
13
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
14
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
15
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
16
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
17
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
18
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
19
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
20
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?

साहेब, आता तरी वाइटाला वाईट म्हणा...

By admin | Updated: November 16, 2014 23:45 IST

मुक्त चिंतन : मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या भावना

जहाँगीर शेख - कागल -गाव तीनशे मतांचं आणि तिथे मुश्रीफांना सहा बैठका घ्याव्या लागतात; कारण गटातच इतके गट.. निवडणुकीसाठी सर्व सामग्री दिली; पण जनतेपर्यंत पोहोचली काय? विरोधक काही तरी मुद्दे काढून जनतेला चिथावणाच; पण याबद्दल त्यांना जाब विचारण्याची धमक आमच्या कार्यकर्त्यांनी दाखविली काय? एक पांढरा शर्ट घातला, मोबाईल कानाला लावला की झाला पुढारीऽऽ चालला कागलला, कोल्हापूरला, साहेबांना भेटायला. साहेब, आता तरी चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणा आणि एकवेळ चुकू दे, पण निर्णय घ्याऽऽ अशा शब्दांत मुश्रीफ गटाच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. मेळावा होता आभाराचा; पण हे मुक्त चिंतन केले कार्यकर्त्यांनी.निकालानंतर महिना होत आल्यानंतर हा मेळावा कागल येथे घेण्यात आला. अपेक्षेप्रमाणे कार्यकर्ते बोलले आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांना पाठबळ दिले. अवकाळी पावसामुळे ऐनवेळी जागा बदलल्याने गैरसोय होऊनही कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते ते या गटाच्या विधानसभेतील कामगिरीचा पंचनामा ऐकण्यासाठी. या कार्यकर्त्यांनी थेट मुश्रीफांनाही खडे बोल सुनावत कार्यपद्धतीत बदल करण्याची विनंती केली.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी सुरुवातीलाच विचारले की, आज या मेळाव्यात कोण कोण बोलणार. त्यानंतर अनेकजण म्हणाले, ‘नाही, आज फक्त ऐकणार! हे जर चार-पाच वर्षे केले असते तर लिड वाढलं असतं.’ संजय हेगडे, राजेंद्र पाटील, बाळासाहेब फराकटे, संदीप मगदूम, सूर्याजी घोरपडे, सूर्यकांत पाटील, काशीनाथ तेली, शिवाजी खोत, भैया माने, रणजितसिंह पाटील या कार्यकर्त्यांनी सडेतोडपणे भावना मांडून एकूण निकालाचा पंचनामा केला.मुश्रीफांनाही खडे बोलऽऽऽसाहेबऽऽ तुम्हीबी विरोधी पार्टीच्या लोकांची चोरून कामे करणे बंद करा. करायचीच असतील तर त्या त्या गावातील आपल्या एखाद्या तरी कार्यकर्त्याला सांगून करा; कारण कामे करून घेऊनही हे लोक उलटा प्रचार करतात आणि आम्हीही त्यांना विचारू शकत नाही. विचारले तर म्हणतात, माझं काम वरनं झालंय, तुझा काय संबंध? कंत्राटदार आणि कार्यकर्ता-नोकरदार, पदाधिकारी यांच्यात फरक करा... अशा शब्दांत मुश्रीफांनाही खडे बोल सुनावण्यात आले. भलेही आमदारकी नसेल तर चालेल...या मेळाव्यात मुश्रीफांनीही स्पष्टपणे भावना व्यक्त करताना सांगितले की, मंत्रिपदामुळे बऱ्याच गोष्टी करता येत होत्या; पण आता मर्यादा येत आहेत. मतदारसंघात दृष्ट लागण्यासारखा गट आपण बांधला आहे. गावागावांत चांगले वागा, आपल्याबद्दल नाराजी होऊ देऊ नका. भलेही मला आमदारकी मिळाली नाही तरी चालेल, पण योग्य असेच काम करा. मी पण कठोर होण्याचा प्रयत्न करेन. चांगल्याला चांगले म्हणेन... माझा स्वभाव बदलण्याचा प्रयत्न करेन.