शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगडाच्या रस्त्यावरून गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 02:53 IST

पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरून विधानसभेत गुरुवारी चांगलाच गदारोळ झाला. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, पतंगराव कदम यांनी हा प्रश्न लावून धरला.

मुंबई : पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरून विधानसभेत गुरुवारी चांगलाच गदारोळ झाला. अजित पवार, दिलीप वळसे पाटील, पतंगराव कदम यांनी हा प्रश्न लावून धरला. शेवटी या कामासाठी ५ कोटींची तरतूद मंजूर केली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने आयआयटीकडून सूचना मागवून त्यानुसार काम करण्यात येणार आहे. मार्च २०१८ पर्यंत या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावरील दरडीबाबात सदस्य भीमराव तापकरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी दिले. पण सदस्यांचे समाधान होत नव्हते. संबंधित खात्याचे कॅबिनेट मंत्री सभागृहात हजर होते. त्यामुळे अजित पवार यांनी पाटील यांना उत्तर देण्यात काय अडचण आहे, असा सवाल केला. तेव्हा पाटील यांनी राज्यमंत्री योग्य उत्तर देत आहेत, असे सांगून त्यांनी दिलेलेच उत्तर परत दिले. पोटे-पाटील म्हणाले, या रस्त्यावर काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडतात तसेच नागमोडी वळणे असल्याने वाहतुकीचा खोळंबाही होतो. या रस्त्यावरील सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण सर्वेक्षण आणि दरडी प्रवणक्षेत्राची पाहणी करण्यासाठी मुंबईतील आयआयटी यांना प्रस्ताव देण्यात आला होता. त्यांनी अभ्यासपूर्ण अहवाल दिल्यावर त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. मात्र लवकरात लवकर म्हणजे कधी, हवेत बोलू नका, तारीख सांगा, असा आग्रह पवार यांनी धरला.हा रस्ता ७.५० कि.मी. वन विभागाअंतर्गत आणि १.५० कि.मी. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येत असल्याने दोन्ही विभागांच्या समन्वयाने तातडीने हे काम पूर्ण करण्यात येत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. या वेळी सदस्य विजय काळे, पतंगराव कदम यांनी उपप्रश्न उपस्थित केले होते.