शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

एक पडदा चित्रपटगृहांना लवकरच सवलती देणार! शरद पवार, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 08:21 IST

मुख्यमंत्री ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिनेमा ओनर्स ॲण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक मागण्या केल्या.

मुंबई : राज्यातील चित्रपटगृहांचा पडदा २२ ऑक्टोबरला उघडला जाणार असला तरी, एक पडदा चित्रपटगृहांच्या भवितव्यावरील प्रश्नचिन्ह कायम असतानाच, आता राज्य शासनाकडून या चित्रपटगृहांना काही सवलती देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. मुख्यमंत्री ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘सिनेमा ओनर्स ॲण्ड एक्झिबिटर्स असोसिएशन’च्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अनेक मागण्या केल्या. २२ तारखेला चित्रपटगृहे सुरू करायची, तर किमान १५ प्रकारची ना हरकत प्रमाणपत्रे मिळवावी लागतील आणि इतक्या कमी अवधीत ती मिळणे शक्य नाही. म्हणून या प्रमाणपत्रांची संख्या कमी करावी, अशी मागणी असोसिएशनचे अध्यक्ष नितीन दातार यांनी केली. त्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. तसेच, आर्थिक कोंडीत सापडलेल्या एक पडदा चित्रपटगृहांना दिलासा  देण्यासाठी वित्त विभागाच्या समन्वयाने योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पोलीस महासंचालक संजय पांडे उपस्थित होते. असोसिएशनतर्फे नितीन दातार, निमेश सोमय्या, पूना एक्झिबिटर असोसिएशनचे सदानंद मोहोळ, अशोक मोहोळ, प्रकाश चाफळकर यांनी मागण्या सादर केल्या.संघटनेच्या मागण्या...सिनेमा परवान्याचे  विनामूल्य नूतनीकरण करून द्यावे.जीएसटी भरल्यानंतर प्रत्येक तिकिटामागे २५ रुपये सेवाशुल्क आकारण्यास परवानगी द्यावी.विद्युत वापर नसल्याने देयके किमान वापरावर आधारित असू नयेत.चित्रपटगृहे बंद असल्याच्या काळातील मालमत्ता कर आकारू नये.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार