मुंबई : भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यास सिंगापूर प्रशासनाने विशेष कॅम्पेन घोषित केले आहे. या अंतर्गत आॅक्टोबरपासून डिसेंबर महिन्यापर्यंत दीपावली आणि नाताळची धूम सिंगापूरमध्ये पाहायला मिळेल.सिंहांचे शहर म्हणून ओळख असलेल्या सिंगापूरमध्ये भारतीय पर्यटकांनी सुट्टीत सहलीस यावे, हा कॅम्पेनचा मुख्य उद्देश आहे. तसेच भारतीय पर्यटकांना सिंगापूरमध्ये थेट प्रवेश असून, त्यासाठी प्रशासनाने व्हिसामुक्त संक्रमण सुविधा सुरू केली आहे. यामुळे विविध उत्सवांसाठी ९६ तासांच्या व्हिसामुक्त प्रवेशाचा आनंद पर्यटकांना लुटता येईल. (प्रतिनिधी)
भारतीयांसाठी सिंगापूरच्या पायघड्या
By admin | Updated: October 31, 2016 05:48 IST