शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गची ‘दफ्तरनोंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 05:23 IST

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या गॅझेटीअर डिपार्टमेंट यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा गॅझेटीअरची निर्मिती करण्यात येणार आहे

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या गॅझेटीअर डिपार्टमेंट यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा गॅझेटीअरची निर्मिती करण्यात येणार आहे. याविषयी नुकतीच दर्शनिका विभागाचे कार्यकारी संपादक व सचिव डॉ.दिलीप बलसेकर यांनी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व इतिहास संशोधकाची बैठक घेतली.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या गॅझेटिअरमध्ये एकूण १२ प्रकरणे आहेत. जिल्ह्याचा भूगोल, इतिहास, लोक राहणीमान, जीवनमान, उद्योगधंदे, कृषी व जलसिंचन, प्रशासन, संस्कृती, प्रेक्षणीय स्थळे, सामाजिक सेवा या व अशा अनेक विषयांवर प्रकाश टाकणारा संदर्भपूरक ग्रंथ असणार आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांच्या संबंधित विषयाच्या अनुषंगाने माहिती संकलन करून योगदान करावे, असे आवाहन गॅझेटिअर विभागाने केले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड व किल्ले, तेथील बोलीभाषा, साहित्य, कविता, तेथील यात्रा व उत्सव या विषयावर समग्रपणे माहिती गॅझेटिअरमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा ग्रंथ निर्माण करण्याच्या दृष्टीने दर महिन्याला दुसऱ्या सोमवारी गॅझेटीअरसाठी नियुक्त केलेल्या सदस्यांची बैठक घेऊन कामाचा आढावा घेण्यात येईल. हे गॅझेटीअर सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगाच्या दृष्टीने केवळ पुस्तक रूपातच न राहता ई-बुक स्वरुपातही येणार आहे. त्यासाठी आवश्यक ध्वनीचित्रफित हे जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात येतील, अशी माहिती डॉ.बलसेकर यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)