शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

मालवणात आजपासून सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सव

By admin | Updated: January 29, 2015 00:18 IST

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन : जिल्हा विकासाबाबत घोषणेकडे लक्ष

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्यादृष्टीने मैलाचा दगड ठरणाऱ्या ‘सिंधुदुर्ग महोत्सवा’चे उद्घाटन उद्या, गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच जिल्ह्यात येणारे मुख्यमंत्री फडणवीस हे जिल्हा विकासाच्यादृष्टीने कोणती घोषणा करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.सिंधुदुर्ग पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन बोर्डिंग मैदानावर उद्या, गुरुवारी दुपारी २ वा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, खासदार विनायक राऊत, खासदार भालचंद्र मुणगेकर, आमदार विजय सावंत, रामनाथ मोते, अनिल तटकरे, निरंजन डावखरे, वैभव नाईक, नीतेश राणे, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, ‘एमटीडीसी’चे व्यवस्थापकीय संचालक पराग जैन, विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार, युएनडीपी प्रकल्पाचे प्रमुख एन. वासुदेवन, आदी उपस्थित राहणार आहेत.महोत्सवाची सांगता शनिवारी (दि. ३१) सायंकाळी ६ वाजता पर्यटन गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. गुरुवारी (दि. २९) चिवला बिच येथे सुदर्शन पटनाईक यांच्या वाळू शिल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सायंकाळी ५ वा. स्थानिक लोककलाकारांचा कार्यक्रम, तर ७ वा. ‘जल्लोष’ हा मराठी सिनेकलाकारांचा मनोरंजनपर कार्यक्रम होणार आहे. शुक्रवारी ( दि. ३०) सकाळी १० ते १२ या वेळेत सिंधुदुर्ग पर्यटन संधी परिसंवाद, दुपारी ३ ते ५ मालवणी खाद्यपदार्थांचे सादरीकरण, सायंकाळी ५ ते ७ सांस्कृतिक कार्यक्रम, ७ ते १० सिनेअभिनेते विजय कदम यांचा ‘खुमखुमी’ हा कार्यक्रम होणार आहे. शनिवारी (दि. ३१) कृषी कार्यशाळा, कलाविष्कार, महोत्सवाचा समारोप सोहळा होणार आहे. मालवण येथे आयोजित सिंधु पर्यटन महोत्सवाला भव्य शोभायात्रेने प्रारंभ होणार असून, मालवण शहरातून गुरुवारी ( दि. २९) सकाळी १० वा. ही शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत जिल्ह्यातील पर्यटनाबरोबरच विविध संस्कृतींचे दर्शन घडविणारे आकर्षक चित्ररथ सहभागी होणार आहेत. पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने बोर्डिंग मैदानावर ‘गेट वे आॅफ इंडिया’ची प्रतिकृती असलेले प्रवेशद्वार उभारले आहे. आज, बुधवारी सुरक्षा यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांचे बोर्डिंग मैदानावर संचलनही झाले. (प्रतिनिधी)