शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

सिंधुदुर्गातील नेत्यांनी फक्त लाचारी दिली : मनोहर पर्रीकर

By admin | Updated: October 13, 2014 23:08 IST

टोलवरून राडा करणाऱ्या राणे पुत्राला मी गोव्यात धडा शिकवला. तुम्ही त्यांना तडीपार करा.

कणकवली : सिंधुदुर्गातील नेत्यांनी येथील जनतेला फक्त लाचारी, गुंडगिरी दिली. गोव्यापेक्षा चांगला निसर्ग असूनही दळीद्री, उन्मत्त व भ्रष्टाचारी राज्यकर्त्यांमुळे येथे विकास झाला नाही. भाजपा जिल्ह्यात खिजगणतीत नव्हती आणि आता विराट स्वरूप दिसत आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बोलताना केले. ते कासार्डे येथील भाजपाच्या प्रचारसभेत बोलत होते.पर्रीकर म्हणाले की, जिल्ह्यात हॉटेल व्यवसाय सुरू करायचा झाल्यास राणे पितापुत्रांना २६ टक्के भागिदारी द्यावी लागते. कुडाळ येथील हिरोहोंडा शोरूममध्ये ती मिळाली नाही म्हणून गाड्या जाळण्यात आल्या. अशा प्रवृत्तीला धडा शिकवा. टोलवरून राडा करणाऱ्या राणे पुत्राला मी गोव्यात धडा शिकवला. तुम्ही त्यांना तडीपार करा.प्रमोद जठार म्हणाले की, आता विकासाचे पर्व सुरू झाले आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत विकास घडवून दाखवू. केंद्र्रातील सरकारने राज्याला महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ५ हजार कोटी दिले. सत्ता दिली तर महाराष्ट्राच्या विकासासाठी ५० हजार कोटी आणू. भाजपा कार्यकर्त्यांच्या केसाला धक्का लागला तरी सोडणार नाही. भाजपाच्या माध्यमातून राज्यपाल आले आणि सिंधुदुर्गचा कॉँग्रेसचा जिल्हापरिषद अध्यक्ष तडीपार झाला. आता तुम्ही राणे पुत्राला तडीपार करा. माजी आमदार अजित गोगटे म्हणाले की, आप्पा गोगटेंच्या प्रचारासाठी गोपीनाथ मुंढे नंतर प्रमोद महाजनांची सभा झाली होती. त्यावेळी गोगटेंचा विजय झाला होता. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेने जठारांना विजयाची निश्चिती मिळाली आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी गोव्याच्या तुलनेत सिंधुदुर्गची आरोग्य यंत्रणा कुचकामी आहे. जिल्ह्यातील विकासकामांकडे कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे दुर्लक्ष झाले आहे. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असूनही येथे बेरोजगारी राहिली. जिल्ह्याला लाभलेले समुद्रकिनारे चांगले असूनही पर्यटनाचा विकास करण्यात येथील नेत्यांना यश आलेले नाही. (प्रतिनिधी)नरेंद्र मोदींच्या सभेची क्षणचित्रेविधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्गात झालेल्या आतापर्यंतच्या गर्दीचा उच्चांक पंतप्रधान मोदींच्या सभेला झाला होता.भाजपाकडून बूथनिहाय बसेस सोडण्यात आल्या होत्या. सुमारे २०० हून अधिक बसेस यांच्यासह कार, दुचाकीवरून सभेसाठी लोक जमले होते. सभास्थानापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती. लोकांनी तेथून चालत सभास्थान गाठले.महिला आणि पुरूषांसाठी वेगवेगळी आसनव्यवस्था ठेवण्यात आली होती. सभास्थानावर प्रत्येकाला तपासूनच आत सोडण्यात आले. पाण्याची बाटली आदी वस्तू सभास्थळी नेण्यास प्रतिबंध करण्यात आला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १.५५ वाजता सभास्थळी आगमन झाले. २ वाजता मोदींनी बोलण्यास सुरूवात केली आणि २.२५ वाजता त्यांनी आपले भाषण संपवले.पंतप्रधानांचे स्वागत जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, रेश्मा जोशी, तन्वी मोदी आदींनी केले.सभेपूर्वी आणि सभेनंतर महामार्गावर वाहने आणि लोकांची रांग लागली होती.