शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हिगसाठी सिम्युलेटर

By admin | Updated: August 7, 2014 01:03 IST

घाटाचा रस्ता, हायवे, पाऊस, बोगदा, कच्चा रस्ता आणि एकूणच सर्व रस्त्यांवर गाडी चालविताना काय काळजी घ्यावी? याचे प्रशिक्षण देण्यासाठी एसटी महामंडळाने पाऊल उचलले आहे. एसटीच्या

प्रशिक्षित चालक घडणार : राज्यातील पहिली ‘सिम्युलेटर’ नागपुरात दाखलदयानंद पाईकराव - नागपूरघाटाचा रस्ता, हायवे, पाऊस, बोगदा, कच्चा रस्ता आणि एकूणच सर्व रस्त्यांवर गाडी चालविताना काय काळजी घ्यावी? याचे प्रशिक्षण देण्यासाठी एसटी महामंडळाने पाऊल उचलले आहे. एसटीच्या चालकांना आगामी आठ दिवसांत हे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे. परंतु हे प्रशिक्षण एखादा प्रशिक्षित चालक देणार नसून हे प्रशिक्षण देणार आहे ‘सिम्युलेटर’ नावाची मशीन. होय, राज्यातील पहिली ‘सिम्युलेटर’ मशीन एसटीच्या नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयात दाखल झाली आहे.चारचाकी वाहन चालविण्यासाठी पारंपरिक पद्धतीनुसार सर्व जण ‘ड्रायव्हिंग स्कूल’मध्ये प्रवेश घेतात. मात्र, आता एसटीच्या नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयातील ‘टेक्नो सीम ड्रायव्हिंग सिम्युलेटर’ ही मशीनच एसटी बस चालविण्याचे धडे देणार आहे. वेस्टर्न इंडिया आॅटोमोबाईल असोसिएशन मुंबईने (डब्ल्यूआयएए) एसटीशी सामंजस्य करार करून एसटीच्या मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती येथील प्रादेशिक कार्यालयस्तरावर ‘सिम्युलेटर’ उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. त्यापैकी पहिले ‘सिम्युलेटर’ नागपूरच्या विभाग नियंत्रक कार्यालयात दाखल झाले आहे. यात यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ ‘डब्ल्यूआयएए’चे राहणार असून, एसटीला फक्त जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. वाहन चालविताना चालकाला पाऊस, घाटाचा रस्ता, चढ-उतार, हायवे, बोगदा, कच्चा रस्ता अशा वेगवेगळ्या परिस्थितीतून वाहन चालवावे लागते. या परिस्थितीत वाहन कसे चालवावे, याचे अचूक प्रशिक्षण ही मशीन देणार आहे. चालक या मशीनच्या ‘ड्रायव्हिंग सीट’वर बसल्यानंतर तो कसे वाहन चालवितो याचे संगणकावर रेकॉर्डिंग होईल. चालकाने चूक केली की वाहन बंद पडेल. चालकाचे वाहन चालविणे संपल्यानंतर त्याचा अहवाल निघून चालकाच्या चुका कळतील. विभाग नियंत्रक कार्यालयातील या मशीनवर खाजगी आणि एसटीचे चालक दोघांनाही प्रशिक्षण देण्यात येईल. एसटीच्या चालकाला १०० रुपये आकारण्यात येतील. तर खाजगी चालकाकडून किती पैसे आकारायचे, याचा निर्णय ‘डब्ल्यूआयएए’ घेणार आहे. त्यामुळे एसटीच्या चालकांकडून होणारे अपघाताचे प्रमाण शून्यावर येऊन एसटीचा मोठा महसूल वाचणार आहे.