शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
3
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
4
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
5
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
6
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
7
Operation Sindoor : जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
8
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
9
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
10
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
11
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
12
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
13
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
14
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
15
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
16
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
17
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
18
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
19
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
20
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  

सिमरन एकतर्फी प्रेमाचा बळी

By admin | Updated: November 24, 2014 03:29 IST

एकतर्फी प्रेम करणारा प्रियकर, त्याच्याबरोबर प्रेमासाठी दबाव टाकणारे मित्र-मैत्रीण यांच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून १४वर्षीय मुलीने आत्महत्येचा पर्याय निवडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

मनीषा म्हात्रे, मुंबईएकतर्फी प्रेम करणारा प्रियकर, त्याच्याबरोबर प्रेमासाठी दबाव टाकणारे मित्र-मैत्रीण यांच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून १४वर्षीय मुलीने आत्महत्येचा पर्याय निवडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रियकर साहील शेख (१८) आणि मित्र कमलेश यादवसह (१८) एका १५वर्षीय मुलीला अटक करून मुलुंड पोलिसांनी तपास सुरू केला. मुलुंड कॉलनी येथे आईवडिलांसमवेत राहणारी १४वर्षीय सिमरन केणी परिसरातील जय भारत हायस्कूलमध्ये दहावी (अ) वर्गामध्ये शिक्षण घेत होती. शाळेतीलच दहावी (ब)मध्ये तिची जिवलग मैत्रीण आयेशा (नाव बदलले आहे) शिक्षण घेते. गेल्या वर्षी या दोन्ही मैत्रिणींची ओळख साहील आणि कमलेशशी झाली. पहिल्या भेटीतच साहील सिमरनच्या प्रेमात पडला. तिची जिवलग मैत्रीण आयेशा हिनेही तिला साहीलला होकार देण्यासाठी गळ घातली. ते एकत्र फिरत असल्याचे तिच्या वडिलांना समजले होते. त्यानंतर त्यांनी तिला आणि साहीलला दमदेखील भरला होता. हळूहळू सिमरन साहीलला दूर राहण्याबाबत सांगत होती. त्यानंतर साहील एकतर्फी प्रेमातून आत्महत्या करण्याची धमकी देत तिला भेटण्याची जबरदस्ती करायला लागला. यात आयेशा आणि कमलेशही साहीलला भेटली नाहीस तर तो आत्महत्या करेल, म्हणून तिच्यावर दडपण आणत होते. साहीलला भेटण्यास टाळाटाळ करूनही साहील शाळेत येता-जाता तिचा मार्ग अडवायला लागला. त्यात आयेशा आणि कमलेश त्याचे निरोप तिच्यापर्यंत पोचवून तिला त्रास द्यायचे. त्यात या प्रकरणात घरी मिळणाऱ्या ओरड्यामुळे आणखीन भर पडत होती. यातून काहीच मार्ग न मिळाल्याने अखेर सिमरनने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतल्याचा धक्कादायक प्रकार तिच्या वडिलांनी दिलेल्या जबाबातून समोर आला. सिमरनच्या आत्महत्येच्या धक्क्याने आई बराच वेळ बेशुद्धावस्थेत होती. सिमरनच्या आईवर मुलुंडच्या एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तिघा आरोपींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्याखाली अटक केल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुगुटराव यांनी दिली. आरोपींचे मोबाइल ट्रेसिंगला पाठविण्यात आले आहेत. हातावरील एम कमलेशचा?सिमरनच्या डाव्या हातावरील ‘आय हेट यू एम’ मधील ‘एम’ हा प्रियकराचा नसून, तिने लिहिलेल्या कमलेश नावामधील असल्याचे समोर आले. त्यातही त्याच्या शेजारी लिहिलेला आठ नंबरी मोबाइल क्रमांकही कमलेशचाच असून, या प्रकरणात कमलेशचा काय संबंध आहे याचाही शोध पोलीस घेत आहेत. बंद टेरेसवर संशयास्पद शूज?सिमरनने ४.५०च्या सुमारास महावीर टॉवरमधील इमारतीत प्रवेश केल्याचे दिसते. त्या वेळी तिच्या पायात असलेले पांढऱ्या रंगाचे शूज तिच्या मृतदेहाजवळ नव्हते. त्यात पोलीस तपासात हे शूज बंद टेरेसवर सापडल्याने तिच्या आत्महत्येमागील संशय आणखीन बळावला आहे.