शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमात आमूलाग्र बदलाचे संकेत

By admin | Updated: October 21, 2015 00:56 IST

सध्या आपल्या देशाची ‘डिजिटल इंडिया’कडे वाटचाल सुरू असल्याने पिढी घडवणारा शिक्षकही त्याच पद्धतीने प्रशिक्षित असायला हवा, या उद्देशाने प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमात

पुणे : सध्या आपल्या देशाची ‘डिजिटल इंडिया’कडे वाटचाल सुरू असल्याने पिढी घडवणारा शिक्षकही त्याच पद्धतीने प्रशिक्षित असायला हवा, या उद्देशाने प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमात आमूलाग्र बदल करण्याचे ठरत आहे. संगणकाचे प्रशिक्षण, व्होकेशनल इंग्रजी, कृतीवर आधारित शिक्षण असे थेट शिक्षकांना समृद्ध करणारे विषय पदविका अभ्यासक्रमात घेण्याचे नियोजन आहे, अशी माहिती या अभ्यासक्रमासाठी नेमण्यात आलेल्या कोअर समितीचे अध्यक्ष डॉ. अ. ल. देशमुख यांनी दिली.राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने २००५मध्ये शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन (एनसीटीई)ने त्यांच्या विविध प्रकाशनांद्वारे मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या स्तरावर समिती नेमण्यात आली आहे. एनसीटीईने तयार केलेल्या अभ्यासक्रमावरून महाराष्ट्राच्या स्थानिक परिस्थितीत त्याची पुनर्रचना कशी करता येईल, अद्ययावत कसे करता येईल, यासाठी ही समिती काम पाहील. शासनाने यासाठी समिती जाहीर केली आहे. ही समिती ३१ आॅक्टोबरपर्यंत नवीन अभ्यासक्रम शासनाला सादर करणार आहे.या समितीच्या कामकाजाबाबत डॉ. देशमुख म्हणाले, ‘‘एनसीटीईच्या अभ्यासक्रमात स्थानिक पातळीच्या अनुषंगाने बदल करून त्याची पुनर्रचना करण्याचे काम केले जाणार आहे. यामध्ये डिजिटल इंडिया ही संकल्पना लक्षात घेऊन अभ्यासक्रमात प्रत्येकाला संगणक कसा हाताळता येईल, याकडे लक्ष दिले जाईल. यासाठी पहिल्या वर्षी संगणक हाताळणे आणि दुसऱ्या वर्षी संगणकाचा योग्य वापर करून मुलांना विविध विषयांची गोडी लावता येणे याअनुषंगाने प्रशिक्षण देण्याचा विचार आहे. त्याचबरोबर शिक्षकाने आपल्या स्थानिक भाषेबरोबरच इंग्रजीत ही प्रभुत्व मिळवायलाच हवे यासाठी ‘व्होकेशनल इंग्रजी’ विषयाला अंतर्भूत करणार आहोत. योग शिक्षणाचीही माहिती दिली जाणार आहे. याचबरोबर सध्या कृतीवर आधारित शिक्षणाचा कल वाढत असल्याने आणि शिक्षणप्रवाहात नवनवे विचार रूढ होत असल्याने त्याप्रमाणे अभ्यासक्रमाची रचना करण्याचे विचाराधीन आहे.’’(प्रतिनिधी)एनजीओ मॉडेलचा विचारराज्यात शिक्षक प्रशिक्षणाच्या अनुषंगाने काही स्वयंसेवी संस्था उत्तम काम करीत आहेत. त्यांनी तयार केलेल्या मॉड्युलना यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांना विनंती करून त्यांचे यशस्वी मॉड्युलचे सादरीकरण करून त्यातील चांगल्या बाबी घेण्यास उत्सुक आहोत. आय टीच, मुक्तांगण, मुंबई, कनेक्ट इंडिया यासारख्या ५ स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत.अध्यक्षस्थानी शिक्षणतज्ज्ञ डॉ. अ. ल. देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. समितीत इतर १३ सदस्य आहेत. यामध्ये डॉ. नवनाथ तुपे, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. उमेश प्रधान, मधुकर बानुरी, जुमाना रामपूरवाला, डॉ. हनुमंत नारायण जगताप, भूषण पाटील, डॉ. दत्तात्रय तापकीर, डॉ. मेधा गुळवणी, डॉ. रमा भोसले, देवेंद्र देवणीकर, डॉ. सर्जेराव ठोंमरे, रेणू दांडेकर यांचा समावेश आहे.