शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लोकमत दिल्लीत पण जातय ही मराठी पेपरसाठी मोठी बाब - सिद्धार्थ मल्होत्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 23:16 IST

लोकमत दिल्लीत पण जातय ही मराठी पेपरसाठी मोठी बाब आहे. महाराष्ट्रात जसा नावाजला आहे तसा दिल्लीतही जाणार असं सांगत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने लोकमतला शुभेच्छा दिल्या आहेत. लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्याला सिद्धार्थ मल्होत्रा उपस्थित होता.

मुंबई - लोकमत दिल्लीत पण जातय ही मराठी पेपरसाठी मोठी बाब आहे. महाराष्ट्रात जसा नावाजला आहे तसा दिल्लीतही जाणार असं सांगत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने लोकमतला शुभेच्छा दिल्या आहेत. लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 सोहळ्याला सिद्धार्थ मल्होत्रा उपस्थित होता. महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अभिनेता म्हणून सिध्दार्थ मल्होत्राला पुसस्कार देण्यात आला. लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा आणि लेखक चेतन भगत यांच्या हस्ते सिद्धार्थ मल्होत्राला पुरस्कार देण्यात आला 

'लोकमतने असा मंच उपलब्ध करून दिला आहे, ज्या मंचावर कलाकारांबरोबर प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती पाहायला मिळाली.  हा गौरव खूप मोठा आहे. लोकमत दिल्लीत पण जातय ही मराठी पेपरसाठी मोठी बाब आहे. महाराष्ट्रात जसा नावाजला आहे तसा दिल्लीतही जाणार', असं सिद्धार्थ मल्होत्रा बोलला आहे. 

यावेळी आलिया भटला मोस्ट स्टायलिश रायजिंग स्टार हा पुरस्कार देण्यात आला. आलिया भटने स्टेजवर चेतन भगत यांच्यासोबत सेक्सी राधा गाण्यावर डान्सही केला. विशेष म्हणजे आलिया यावेळी मराठीतही बोलली. जेव्हा कधी आपण एखाद्याच्या स्टाईलचं कौतुक करतो तेव्हा आपण त्याच्या व्यक्तिमत्वाचं कौतुक करत असतो असं अभिनेत्री आलिया भटने सांगितलं आहे. 

लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. साई रिअल इस्टेट प्रस्तुत या सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती.  मुंबईतील ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात हा सोहळा सुरु आहे. सोहळ्यात चारचाँद लावण्यासाठी बॉलीवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचीही उपस्थिती आहे. 

लोकमतच्या महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्स 2017 पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे. साई रिअल इस्टेट प्रस्तुत या सोहळ्याची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उत्कंठा निर्माण झाली होती.  मुंबईतील ताज लँडस् एण्ड हॉटेलमध्ये अतिशय स्टायलिश अंदाजात हा सोहळा सुरु आहे. सोहळ्यात चारचाँद लावण्यासाठी बॉलीवुडसह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टायलिश सेलिब्रिटी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांचीही उपस्थिती आहे. 

लोकमत महाराष्ट्राज् मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड सोहळ्याचे प्रोगेस पार्टनर कार्लटन, स्टार कॉस्मेटिक्स, जॉनी वॉकर तसेच झूम ,पिंक व्हिला, अफॅक्स आणि झी मराठी पार्टनर आहे.या सोहळ्यात मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी तसेच टीव्ही जगतातील कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. आजवर आपण अनेक पुरस्कार सोहळे पाहिले असतील मात्र लोकमतच्या वतीने आयोजित हा सोहळा थोडा हटके आणि खास आहे. कारण महाराष्ट्राच्या मोस्ट स्टाइलिश पर्सनालिटीजलाच या पुरस्काराचे मानकरी होता येत आहे. या सोहळ्याला विविध सेलिब्रिटींची उपस्थिती लाभली आहे. 

ट्रॉफीही स्टायलिशमहाराष्ट्रातील मोस्ट स्टायलिश लोकांना गौरवान्वित करण्यासाठी तशीच स्टायलिश ट्रॉफीही यंदा तयार करण्यात आली आहे. स्टायलिश महिला असो वा स्टायलिश पुरुष, दोघांचाही गौरव करण्यासाठी ही ट्रॉफी तयार करताना विचार करण्यात आला आहे. एका बाजूला लावण्य रुपी महिला तर मागच्या बाजूला बलदंड पुरूष साकारून डिझाइनचा एक नवा स्टायलिश आदर्श नमुनाच या निमित्ताने तयार करण्यात आला आहे़ अशा प्रकारची ट्रॉफी यापूर्वी कधीच तयार झाली नाही. 

टॅग्स :LMMS Awards 2017लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टाइलिश अवॉर्ड्स २०१७