शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आजारी भावाला बघायला गेले आणि...

By admin | Updated: August 6, 2016 04:49 IST

महाड येथील दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या कारमधील व्यक्तींमध्ये सानपाड्यामधील दत्ताराम मिरगल यांचाही समावेश आहे.

सूर्यकांत वाघमारे,

नवी मुंबई- महाड येथील दुर्घटनेत बेपत्ता असलेल्या कारमधील व्यक्तींमध्ये सानपाड्यामधील दत्ताराम मिरगल यांचाही समावेश आहे. ते गुहागरला आजारी चुलत भावाला भेटायला गेले होते. सर्व नातेवाइकांसह तवेरा कारने परत येत असताना हा भीषण अपघात घडला आहे.महाड येथील दुर्घटनेमुळे सानपाडा सेक्टर ५ येथील मंगलमूर्ती सोसायटीतदेखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. येथील रहिवासी दत्ताराम मिरगल (६१) हे त्यांच्या चुलत भावाला भेटायला गुहागरमधील जांभोडी या गावी गेले होते. परंतु नातेवाइकांसह ते ज्या तवेरा कारने परत मुंबईकडे येत होते, ती कार पुलाच्या दुर्घटनेत वाहून गेली आहे. त्यांच्यासोबत सांताक्रुझ व मुंबईच्या इतर भागातील आठ नातेवाईकदेखील होते. त्यांनीच गावी जाऊन येण्यासाठी तवेरा गाडी केली होती. त्यामुळे गावी जातानादेखील त्यांनी दत्ताराम यांना सोबत बोलावले होते. परंतु कारऐवजी ते खासगी ट्रॅव्हल्सने गावी गेले होते. येताना मात्र सर्व नातेवाइकांनी सोबत मुंबईला जाण्याचा हट्ट केल्यामुळे ते तवेरा कारमधून येत होते. यादरम्यान महाड येथे सावित्री नदीवरील वाहून गेलेल्या पुलासोबत त्यांचीही कार वाहून गेली. या कारमधील माय-लेकींचे मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावर सापडले आहेत. शेवंती मिरगल व संपदा वाझे अशी त्यांची नावे असून, शेवंती या सानपाड्याचे दत्ताराम मिरगल यांच्या काकू आहेत. तवेरा कारमधील इतर प्रवाशांबाबत मात्र अद्याप काहीच माहिती हाती लागलेली नाही. त्यामुळे मिरगल यांच्या मुलांसह, निकटवर्तीय तसेच स्थानिक नगरसेवक सोमनाथ वास्कर हे तीन दिवसांपासून घटनास्थळी तळ ठोकून आहेत. >दत्ताराम मिरगल यांनी गणपतीसाठीदेखील गावी जाण्याकरिता एसटीचे बुकिंग करून ठेवले होते. गणेशोत्सव काळात प्रतिवर्षी ते गावी जात असत. मात्र यंदाच्या गणेशोत्सवापूर्वीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आहे