शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
3
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
4
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
5
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
6
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
7
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
8
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
9
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
10
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
11
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
12
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
13
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
14
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
15
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
16
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
17
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
18
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
19
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
20
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!

शीना बोरा हत्या प्रकरणी ड्रायव्हर श्याम राय माफीचा साक्षीदार

By admin | Updated: June 20, 2016 13:41 IST

शीना बोरा हत्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायलयाने ड्रायव्हर श्याम रायला माफीचा साक्षीदार करण्यास परवानगी दिली आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 20 - शीना बोरा हत्या प्रकरणाला नवं वळण मिळालं असून आरोपी श्याम रायला माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं आहे. विशेष सीबीआय न्यायलयाने श्याम रायला माफीचा साक्षीदार करण्यास परवानगी दिली आहे. आरोपी श्याम रायने स्वत: माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली होती. गुन्ह्या संदर्भात मला महत्वाचे खुलासे करायचे असून, मला माफीचा साक्षीदार बनायचे आहे असं दोन पानी पत्रच श्याम रायने न्यायालयाला लिहिलं होतं. 
 
(शीना बोरा हत्येप्रकरणी पीटर मुखर्जीविरोधात चार्जशीट दाखल)
 
शीना बोरा हत्या प्रकरणी मी सर्व खुलासा करणार आहे. माझी आणि इतरांची या हत्येत काय भुमिका होती मी खुलासा करेन असं श्याम रायने न्यायालयात सांगितलं आहे. शीना बोरा हत्येप्रकरणी सर्वात पहिली अटक श्याम रायला झाली होती. इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर म्हणून काम करणा-या श्याम रायला ऑगस्ट २०१५ मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर ख-या अर्थाने या हत्येचा उलगडा झाला होता. 
 
श्याम रायमुळेच झाला हत्येचा उलगडा  -
शीना बोरा हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी २१ ऑगस्ट २०१५ रोजी सर्वात आधी चालक श्यामवर राय याला अटक केली होती. त्याने शीना बोराच्या हत्येचा खळबळजनक खुलासा पोलिसांसमोर केला होता. त्याने सांगितले की, इंद्राणी मुखर्जीने २४ एप्रिल २०१२ रोजी शीनाची हत्या करून मृतदेह एक दिवसानंतर २५ एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यातील गागोदे गावाजवळ जंगलात फेकून दिला होता. श्याम रायने दिलेल्या माहितीची पोलिसांनी खातरजमा सुरू केली. त्यात त्यांना २३ मे २०१२ रोजी जंगलात एका अज्ञात मुलीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीसह तिचा माजी पती संजीव खन्ना व नंतर १९ नोव्हेंबर २०१५ रोजी पीटर मुखर्जीला अटक केली होती. शीना बोरा ही पीटरची मुलगी होती.
काय आहे शीना बोरा हत्या प्रकरण-
- एप्रिल 2012 मध्ये इंद्राणीने दुसरा पती संजीव खन्ना आणि चालक श्यामवर राय यांच्या मदतीने आपली मुलगी शीनाची हत्या केली होती. त्यानंतर तिचा मृतदेह रायगडजवळच्या जंगलात टाकून दिला होता.
- शीना ही इंद्राणीला पहिल्या पतीपासून झालेली मुलगी होती. 
- ऑगस्ट 2015 मध्ये मुंबईपासून 80 कि.मी. अंतरावर रायगडच्या जंगलात शीनाच्या मृतदेहाचे अवशेष सापडले होते.
- डीएनए चाचणीत इंद्राणीच्या रक्ताचे नमुने शीनाच्या हाडांशी जुळले. त्यानंतर शीनाची उंची पाच फूट तीन इंच होती तसेच गळा आवळून शीनाचा मृत्यू झाला असे या अहवालात म्हटले होते.
- शीना बोरा हिच्याशी साखरपुडा होऊन लग्न करण्याच्या तयारीत असलेल्या राहुल मुखर्जी याने शीना गायब होताच तिचा शोध सुरू केला होता. वडील पीटर यांच्याकडे तो वारंवार विचारणा करीत होता. शीनाशी प्रत्यक्ष बोलणे करून देण्याची विनंती करीत होता. परंतु पीटरने ती विनंती फेटाळली होती.
- शीना व पीटर यांच्यात आर्थिक वाद होते त्यातून शीनाची हत्या करण्यात आली. तसेच केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे तर पीटर मुखर्जी यांचा मुलगा राहुल याच्याशी असलेल्या संबंधामुळेच शीनाची हत्या करण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला आहे.
- पीटरचा मुलगा राहुल आणि इंद्राणीची मुलगी शीना हे सावत्र बहीण-भाऊ असल्यामुळे त्यांचे संबंध इंद्राणीसह पीटर या दोघांनाही मान्य नव्हते. 
- इंद्राणीला राहुल आवडत नव्हता. शीनासोबत असलेल्या संबंधांमुळेच खरेतर राहुलबद्दल तिला राग होता. त्यामुळे शीनाची हत्या केल्यानंतर तिच्या मोबाइल फोनवरून पाठविलेले संदेश वा शीना असल्याचे भासवून एकदा प्रत्यक्ष बोलण्याचा प्रयत्न झाल्यानंतरही राहुलने आपल्याला फक्त शीनाशी एकदा बोलायचे आहे. तिचा आवाज ऐकून तिने नकार दिल्यानंतर आपण तिच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही, असे त्याने पीटरला पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले होते. परंतु त्याची ही मागणी पीटरने साफ फेटाळली होती. 
- त्यामुळे सीबीआयने इंद्राणीसह पीटर मुखर्जी याच्यावर आरोपपत्र दाखल केले आहे.