शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

...झाले एकदाचे शुभमंगल सावधान !

By admin | Updated: April 29, 2016 02:56 IST

लग्न समारंभाचा खर्च करण्याची ऐपत नसलेल्या जोडप्यांनी १० ते १५ वर्षानंतर आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लग्न केले

रवी रामगुंडेवार,एटापल्ली (गडचिरोली)- लग्न समारंभाचा खर्च करण्याची ऐपत नसलेल्या जोडप्यांनी १० ते १५ वर्षानंतर आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर लग्न केले. एटापल्ली परिसरातील गोंड आदिवासी जमातीमध्ये आजही हीआगळीवेगळी परंपरा जोपासली जाते. जीवनगट्टा येथील सुमारे १२ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. गोंड जमातीमध्ये आर्थिक परिस्थिती लग्नाच्या आड येत नाही. परिस्थिती हलाखीची असल्यास गोंड जमातीतील परंपरेनुसार कोणताही समारंभ न करता वर वधूला आपल्या घरी घेऊन येतो आणि त्यांचे वैवाहिक आयुष्य रितसर सुरू होते. जेव्हा केव्हा आर्थिक परिस्थिती सुधारेल त्यावेळी लग्नसमारंभ करण्यास परवानगी दिली जाते. गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील गोंड जमातीचे नागरिक मागील अनेक वर्षांपासून ही परंपरा जोपासत आहेत. मात्र आयुष्याच्या शेवटी का होईना लग्नसमारंभ आयोजित केला जातो. जीवनगट्टा येथे गोंड जमातीची एकूण ९६ घरे आहेत. लोकसंख्या ५०० च्या जवळपास आहे. या गावातील १२ जोडप्यांचे विवाह २८ एप्रिल रोजी त्यांच्या घरी पार पडले. भोजनाचा कार्यक्रम मात्र सामूहिक ठेवण्यात आला होता. बोहल्यावर चढलेल्या जोडप्यांनी वैवाहिक आयुष्य सुरू करून दोन ते २० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. विशेष म्हणजे, या सर्वांचा सामूहिक विवाह सोहळा पुढील आठवड्यात गावाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी गावकऱ्यांनी नियोजनही केले आहे. यापूर्वीही १९९४-९५ मध्ये २० जोडप्यांचा विवाह याच गावात लावून देण्यात आला होता. मुलीचे लग्न कसे करायचे, या चिंतेतून किंवा लग्नासाठी काढलेल्या कर्जाचा डोंगर डोक्यावर झाल्याने आत्महत्या होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे. या पार्श्वभूमीवर गोंड जमातीमधील ही परंपरा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.>छोट्याशा गावाने केले मोठे काम...>आर्थिक परिस्थितीमुळे लग्न करून शकणाऱ्या जोडप्यांना एकत्रित राहण्यास समाजाची मान्यता आहे. परंतु अधिकृत लग्न बोहला चढल्याशिवाय अशा जोडप्यांना धार्मिक कार्यात पूजाविधी बंद असते. त्यामुळे त्यांना विवाह करावाच लागतो. त्याचाच हा सोहळा आहे. एका छोट्याशा गावात समाजाच्या पुढाकाराने हे मोठे कार्य पार पडले आहे.- देवानंद गावडे, गोंड समाजातील प्रमुख व्यक्ती