शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

श्रीपाल सबनीस साहित्य संमेलनाध्यक्ष

By admin | Updated: November 7, 2015 04:06 IST

पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान प्राचार्य श्रीपाल सबनीस यांना मिळाला आहे. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत

- कवी विठ्ठल वाघ यांचा पराभव

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान प्राचार्य श्रीपाल सबनीस यांना मिळाला आहे. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सबनीस यांनी कवी विठ्ठल वाघ यांचा ११२ मतांनी पराभव केला. सबनीस यांना ४८५, तर वाघ यांना ३७३ मते मिळाली. प्रकाशक अरुण जाखडे यांना २३० तर शरणकुमार लिंबाळे आणि श्रीनिवास वारुंजीकर यांना अनुक्रमे २५ आणि २ मते मिळाली. एक हजार ७५ पैकी १ हजार ३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २० मते बाद ठरली. निवडून येण्यासाठी आवश्यक मतांची संख्या ५०७ होती. एकल पद्धतीने झालेल्या मतमोजणीत ५०७ मतांपर्यंत कोणीही पोहोचू शकले नाही. पहिल्या फेरीत सबनीस यांना ४३८, वाघ यांना ३२१, जाखडे यांना २२७, लिंबाळे यांना २५ तर वारुंजीकर यांना २ मते मिळाली. (प्रतिनिधी)गुणवत्तेवर निवडमतदारांना पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठविल्या जात असल्या तरी उमेदवार किंवा त्याचे प्रतिनिधी मतपत्रिका गोळा करून निर्वाचन अधिकाऱ्यांकडे आणून देतात. उपरोक्त एकगठ्ठा मतदान पद्धती नको; ती बंद व्हायला हवी, असे मत निर्वाचन अधिकारी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी व्यक्त केले. ही पद्धत बंद झाल्यास उमेदवार गुणवत्तेवर निवडून येईल, असेही ते म्हणाले.