शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

..तर अ‍ॅट्रॉसिटी रद्द केला पाहिजे - राज ठाकरे

By admin | Updated: August 31, 2016 05:49 IST

जातीनिहाय आणि धर्मनिहाय कायदे हवेतच कशाला, असा सवाल करत गैरवापर होत असेल तर अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करायला हवा, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

मुंबई : जातीनिहाय आणि धर्मनिहाय कायदे हवेतच कशाला, असा सवाल करत गैरवापर होत असेल तर अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करायला हवा, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी व्यक्त केले. आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. आरक्षण हे आर्थिक निकषांवरच दिले गेले पाहिजे, असेही राज यांनी म्हटले. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराबाबत राज ठाकरे म्हणाले की, शाळकरी मुलीवरील बलात्कारप्रकरणानंतर मी कोपर्डी गावाला भेट दिली तेव्हा गावकऱ्यांनी अ‍ॅट्रॉसिटीच्या गैरवापराच्या तक्रारी केल्या. या कायद्याच्या दुरुपयोग होत असेल तर तो रद्द करायला हवा. त्याऐवजी दुसरा एखादा कायदा करता येईल, असे राज यांनी सांगितले. अ‍ॅट्रॉसिटी गैरवापराचा मुद्दा मी सर्वप्रथम उपस्थित केला होता. त्या वेळी माझ्या विधानावर अनेकांनी टीका केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनीही अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराविषयी भाष्य केले. मात्र, माझ्यावर झाली तशी टीका त्यांच्यावर झाली नाही. मी काही बोललो तरी टीकेची झोड उठवली जाते. कोपर्डीच्या घटनेनंतर बलात्कार रोखण्यासाठी शरियासारखा कडक कायदा आणावा, असे म्हटले तेव्हाही टीकेची राळ उडविण्यात आली. शरिया नाही, तर कडक कायदा करण्याबाबत मी बोललो होतो. माझ्यावर टीका झाली तरी चालेल. मात्र, महाराष्ट्राच्या हिताचे जे आहे ते मी बोलणारच, असे राज यांनी सांगितले. मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आवाहन राज यांनी पदाधिकाऱ्यांना केले. सध्या देशात निवडणुकीशिवाय दुसरा धंदा उरलेला नाही. मात्र, निवडणुकीत माझ्या पक्षाचे आमदार निवडून येवोत किंवा न येवोत, मला त्याने कोणताही फरक पडत नाही. माझी सत्ता ही रस्त्यावर आहे, असे राज म्हणाले. जीएसटी म्हणजे देशातील सर्वकाही केंद्रशासित करण्याचा डाव आहे. केंद्राला प्रत्येक गोष्टीचे नियंत्रण स्वत:कडे हवे आहे. शहरांना आणि राज्यांकडे काहीच ठेवायचे नाही. उद्या केंद्राने महानगरपालिकेला पैसे दिले नाहीत, तर शहरांचा दैनंदिन कारभार कसा चालणार? वाहतुकीचे नियम मोडले तर भरावा लागणारा दंड वाढवायचा असेल तर केंद्रातून परवानगी लागते. राज्यांना इतके साधे अधिकार नसतील तर राज्य कसे चालणार, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)