शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जावं ‘त्या’ गटात की राहावं गपगुमान आहे तिथंच..?

By अतुल कुलकर्णी | Updated: October 2, 2022 11:05 IST

तात्यासाहेब, एकच सवाल छळतो आहे... जगावं की मरावं असं म्हणून तुम्ही गेलात पण, आज आमच्या अस्वस्थतेनं कैलास शिखर गाठलं आहे... 

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई 

तात्यासाहेब, एकच सवाल छळतो आहे...जगावं की मरावं असं म्हणून तुम्ही गेलात पण, आज आमच्या अस्वस्थतेनंकैलास शिखर गाठलं आहे... एकच सवाल, तात्यासाहेब एकच सवाल...जावं ‘त्या’ गटात की राहावं गपगुमान आहे तिथंच..?हा एकच सवाल दिवसरात्र छळतोय...!

फुकट्या पदावलीचा तुकडा घेऊन...निष्ठेचं कथित प्रमाणपत्र कवटाळून,राहावं बांदऱ्याच्याच रस्त्यांवर...कधीतरी, काहीतरी मिळेल या आशेनंकी जावं बेफाम अनामिक आनंदानं...ठाण्यातल्या मठाच्या दिशेनं...हा एकच सवाल छळतो आहे..!

तुम्ही ग्रेट होतात तात्यासाहेब...म्हणून तुम्ही लिहून गेलात...

“जगावं बेशरम लाचार आनंदानंकी फेकून द्यावं हे देहाचं लक्तरत्यात गुंडाळलेल्या जाणिवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये”आम्ही तर असा सवालही विचारू शकत नाहीकारण प्रश्न विचारणाऱ्यांचं पुढं काय होतं हे तुम्हाला नाही कळणार तात्यासाहेब...!

आमच्या पुढे प्रश्न वेगळेच आहेत तात्यासाहेब,कसा टिकवावा मतदारसंघ...? कशी टिकवावी आमदारकी..? कसा टिकवावा लोकांच्या मनातला विश्वास...?कशी व्यक्त करावी मनातली टोकाची अस्वस्थता,की फेकून द्यावं आता हे खांद्यावरचं जुनाट, मोडीस निघालेलं धनुष्य त्यात गुंडाळलेल्या बोथट बाणांसह...आणि नव्याने मिळणारं धनुष्य घ्यावं हातीत्यातल्या नव्या कोऱ्या टोकदार बाणांसह...आपल्या स्वतःच्या कल्याणासाठी...

कसा करावा तात्पुरता शेवट तात्यासाहेब,मनात निर्माण झालेल्या असंख्य प्रश्नांचा..?की घ्यावा एकदाचा निर्णयमाझ्या मतदारसंघासाठी...माझ्या आमदारकीसाठी...माझ्या टक्केवारीसाठी आणि मिळाली तर माझ्या लाल दिव्याच्या गाडीसाठी...माझ्या एका निर्णयानं,अनेक प्रश्नांना मुक्ती मिळेल तात्यासाहेब...

जगावं की मरावं हा प्रश्न तात्यासाहेब तुमच्या पोरांनी तुमच्यापुढे उभा केला...आमच्या पोरा बाळांसाठी राहावं इथंच की जावं ठाण्याच्या दिशेनंहा खरा प्रश्न आहे आमच्यापुढं...

मुला बाळांचा प्रश्न तुम्हाला नव्हताच तात्यासाहेब, आम्हाला मात्र एकच सवाल छळतो आहे,आमच्या पोरा बाळांच्या भविष्यातील राजकारणाचा.इतकी वर्ष निष्ठेनं काम करून आम्हाला काय मिळालं...?असा सवाल जेव्हा बायका पोरं करतात,तेव्हा काय उत्तर द्यायचं आम्ही..?तेही कोणी सांगत नाही तात्यासाहेब...या अस्वस्थतेनं जीवनाला असा डंख मारला की, नंतर येणाऱ्या निद्रेला आमच्या अस्तित्वाचाच प्रश्न पडावा,त्या निद्रेतही पुन्हा स्वप्न पडू लागली तर...?तर, नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्यासाठी जीव अधीर होत आहे म्हणून जुनेपण सोडणं सहन करतो आहे...तात्यासाहेब, निर्जीवपणानंआमच्या अस्तित्वावर होणारे अत्याचार...आणि मदतीचा मिळालेला खोका घेऊन उभे आहोत ताठ मानेने...आमच्या दयाघनाच्या दाराशी...!

तात्यासाहेब,“तो” आमच्यासाठी जीव ओवाळून टाकायला तयार आहे...एका बाजूला, ज्यांनी आम्हाला जन्म दिलाते आम्हाला विसरतातआणि दुसऱ्या बाजूला, ज्यांनी आम्हाला मदतीचा हात दिला“तो” आमच्यासाठी धावून येतोय...तेव्हा तात्यासाहेब तुम्हीच सांगा आम्ही कोणाच्या पायावर डोकं ठेवायचं...?

टू बी ऑर नॉट टू बी,असा सवाल त्या शेक्सपियरला पडला होता,जगावर की मरावं हा सवाल तुम्हाला पडला होता,आम्हाला मात्रजावं ‘त्या’ गटात की आहे तिथंच राहावं...हा एकच सवाल दिवसरात्र छळतोय...!हा एकच सवाल दिवसरात्र छळतोय...! 

- तूमचाच, बाबूराव

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Politicsराजकारण