शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक...विरोधी पॅनल पडावे, म्हणून केली अघोरी पूजा  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 11:07 IST

WitchCraft News खामगाव तालुक्यातील अडगाव येथे मतमोजणीच्या आदल्या दिवशीच्या रात्री घडलेला हा प्रकार मंगळवारी सायंकाळी उजेडात आला.

ठळक मुद्देसाहेबराव सुरवाडे यांच्या शेतशिवारात ११ मडके फोडून पूजा करण्यात आली. रंगीबिरंगी दोऱ्याच्या साहाय्याने प्रत्येक मडक्याला गळफास लावण्यात आला आहे.या पूजेविषयी माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर माेठी गर्दी केली हाेती.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक संपताच, निवडणूक झालेल्या विविध गावातील हेवेदावे आणि वाद विकोपाला जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे. निवडणुकीदरम्यान खामगाव तालुक्यातील अडगाव येथे भानामतीची पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या पूजेनंतर, तसेच अनेक ठिकाणी पराभव जिव्हारी लागल्याने आगामी काळात वाद विकोपाला जाण्याचे संकेत आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान वर्चस्वाच्या लढाईतून खामगाव तालुक्यातील सुटाळा बु., नांदुरा तालुक्यातील महाळुंगी, वाडी येथे हाणामारीच्या घटना समोर आल्या. घाटावरील काही ठिकाणी वादाच्या घटना घडल्या. निवडणूक, मतमोजणी संपल्यानंतरही गावगाडे शांत बसायचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. खामगाव तालुक्यातील अडगाव येथे विरोधी पॅनलच्या ११ सदस्यांच्या नावाने हिवराच्या झाडाजवळ ‘भानामती’ची पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मतमोजणीच्या आदल्या दिवशीच्या रात्री घडलेला हा प्रकार मंगळवारी सायंकाळी उजेडात आला. या प्रकारामुळे अडगाव येथे एकच खळबळ उडाली आहे.या पूजेविषयी माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळावर माेठी गर्दी केली हाेती. या प्रकरणी पाेलिसात तक्रार दाखल झाली नव्हती. 

११ मडकी फोडण्यापूर्वी दोऱ्यांना गळफास! अडगाव येथील साहेबराव सुरवाडे यांच्या शेतशिवारात ११ मडके फोडून पूजा करण्यात आली. येथे मोठे मातीचे दिवेही फोडण्यात आले आहे. मडके फोडण्यापूर्वी पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या रंगीबिरंगी दोऱ्याच्या साहाय्याने प्रत्येक मडक्याला गळफास लावण्यात आला आहे.

अडगाव येथे अघोरी पूजेच्या प्रकाराची अद्याप माहिती नाही. भानामती, अघोरी पूजा ही एक अंधश्रद्धा आहे. यामुळे कुणाचेही बरे-वाईट होत नाही. तथापि, या प्रकरणी तक्रार आल्यास पूजा करणाऱ्यांचा शोध घेतला जाईल.- रफिक शेख, पोलीस निरीक्षक, खामगाव (ग्रामीण)

विरोधी पॅनल पडावे, म्हणून ११ मडक्यांची पूजा करण्याचा अडगाव येथील प्रकार अतिशय घृणास्पद आहे. लोकशाही मूल्य पायदळी तुडविण्याच्या या प्रकाराची पोलिसांनी त्वरित दखल घेत, संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी. दहशत निर्माण करण्यासाठी अघोरी पूजा केली असावी.- नरेंद्र लांजेवार राज्य कार्यकारिणी सदस्य,अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र

मतदानाच्या आदल्या दिवशी आपल्या शेत शिवारात ११ मडकी ठेवून पूजा करण्यात आली आहे. हा प्रकार सोमवारी शेतात आल्यानंतर निदर्शनास आला. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या ११ एवढी आहे. ११ जणांचे विरोधी पॅनल पडावे, म्हणून हा प्रकार केला असावा, अशी गावात चर्चा आहे.- साहेबराव सुरवाडे शेतकरी, अडगाव ता. खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक