शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक, मुंबईत भररस्त्यात चुंबनासाठी महिलेवर जबरदस्ती

By admin | Updated: March 18, 2017 10:57 IST

रंगपंचमी खेळताना रंगलेल्या चेह-याचा फायदा घेऊन एका युवकाने भररस्त्यात महिलेचे जबरदस्तीने चुंबन घेतले.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 18 - रंगपंचमी खेळताना रंगलेल्या चेह-याचा फायदा घेऊन एका युवकाने भररस्त्यात महिलेचे जबरदस्तीने चुंबन घेतले. मुंबईतील माटुंगा येथील किंगसर्कल परिसरात मंगळवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. पीडित महिला 50 वर्षांची आहे. दुपारचे जेवण केल्यानंतर पीडित महिला पाय मोकळे करण्यासाठी म्हणून खाली उतरली. 
 
इमारतीच्या कंपाऊंडमध्ये महिला फे-या मारत असताना एका विशीतील युवक येऊन तिच्यासमोर उभा राहिला. त्याचा चेहरा आणि कपडे पूर्णपणे रंगाने माखलेले होते. त्याने या महिलेला पकडले व चुंबन घेण्याचा प्रयत्न केला पण महिलेने त्याला विरोध केला. तरीही, या युवकाने जबरदस्तीने चुंबन घेण्याच्या प्रयत्नात या महिलेचा चावा घेतला. ज्यामध्ये ही महिला जखमी झाली. महिला मदतीसाठी आरडाओरडा करत असताना तिने या युवकाल पकडून ठेवले होते पण आरोपीने पूर्ण ताकतीने महिलेला धक्का मारला व तिथून निसटला. 
 
पतीने आणि मुलाने जेव्हा या महिलेला पाहिले तेव्हा ती खाली कोसळलेली होती. तिच्या ओठातून रक्त येते होते. त्यांनी लगेच तिला हाकेच्या अंतरावर असलेल्या सायन रुग्णालयात नेले. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.