ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 5 : सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ गावातील एका रुग्णालयाशेजारी खोदकाम करताना 19 मृत अर्भकं सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिशव्यात अर्भकं किती महिन्यांचे आहेत, हे वैद्यकीय तपासणीनंतर उघड होणार आहे. या रुग्णालयात गर्भलिंग निदान आणि गर्भपात केलं जात असल्याचा पोलिसांना संशय आहे. ही घटना भारती हॉस्पिटलमधील आहे. या घटनेप्रकरणी डॉ. खिद्रापुरे संशयाच्या फेऱ्यात असून त्यांच्या एका साथीदाराला ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती सांगलीच्या पोलीस अधिक्षकांनी दिली. काही दिवसांपूर्वी स्वाती जमदाडे या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता. दोन मुलींनंतर तिसरी मुलगीच असल्याने पतीने पत्नीला गर्भपात करण्यासाठी म्हैसाळमध्ये आणलं होत. त्यानंतर या प्रकरणी प्रविण जमदाडेला अटक करण्यात आली होती, तर डॉ. खिद्रापुरेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना या पिशव्या सापडल्या आहेत.
धक्कादायक - खोदकाम करताना सापडले 19 मृत अर्भकं
By admin | Updated: March 5, 2017 21:22 IST