शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केळगाववर शोककळा, सिल्लोड तालुक्यातील जवान जम्मू-काश्मिरात शहीद

By admin | Updated: June 22, 2017 22:38 IST

जम्मू-काश्मिरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने केलेल्या भ्याड हल्ल्यात सिल्लोड तालुक्यातील केळगावचा जवान संदीप सर्जेराव जाधव (३४) शहीद झाला.

ऑनलाइन लोकमत
सिल्लोड(औरंगाबाद), दि. 22 : जम्मू-काश्मिरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अ‍ॅक्शन टीमने केलेल्या भ्याड हल्ल्यात सिल्लोड तालुक्यातील केळगावचा जवान संदीप सर्जेराव जाधव (३४) शहीद झाला. ही वार्ता कळताच केळगाववर शोककळा पसरली. 
१५ वर्षांपूर्वी संदीप सैन्य दलात भरती झाला होता. त्याच्या निवृत्तीला अवघे दीड-दोन वर्षच बाकी होते. दोन महिन्यांपूर्वीच नातेवाईकाच्या लग्नासाठी संदीप सुटी घेऊन केळगावला आला होता. त्याची ही भेट अखेरचीच ठरली. केळगावातील गोकूळवाडी वस्तीवर त्याचे घर आहे. संदीप शहीद झाल्याचे कळताच गाव शोकसागरात बुडाले. ही दु:खद वार्ता रात्री उशिरापर्यंत त्याच्या घरी पोहचू दिली नव्हती. ग्रामस्थांनी त्याच्या घरात असलेल्या टीव्हीचे केबलही तोडून टाकले होते. संदीपच्या पश्चात आई, वडील, पत्नी उज्ज्वला, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, बहिण असा परिवार आहे. 
यापूर्वी केळगावचे दोन जवान शहीद-
देशाचे संरक्षण करताना केळगावातील दोन जवानांना यापूर्वी वीरमरण आले आहे. माधव नारायण गावंडे हा जवान ८ जुलै २००३ रोजी, काळूबा भाऊराव बनकर हा २७ फेब्रुवारी २०१० रोजी शहीद झाला होता. 
आज पार्थिव येण्याची शक्यता-
शुक्रवारी संदीपचे पार्थिव औरंगाबादेत येण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी ‘लोकमत’ला दिली.