शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहांना जादा वीजदराचा शॉक, वीजतज्ज्ञ हाेगाडे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 06:23 IST

information of electricity expert Haegade : वीज आयोगाने २०२० ते २०२५ या कालावधीसाठी दरनिश्चिती आदेश ३० मार्च, २०२० रोजी जाहीर केले.

मुंबई : खासगी व सार्वजनिक वसतिगृहांना १ एप्रिलनंतरही सार्वजनिक सेवा या सवलतीच्या वीजदराऐवजी जुन्या लघुदाब घरगुती या जादा वीजदराने आकारणी होत आहे. या ग्राहकांनी हरकती नोंद कराव्यात. हरकतीची पोहोच घेतलेली प्रत व अंतिम बिलाची प्रत संघटनेकडे पाठवावी, असे आवाहन महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष व वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी केले आहे.वीज आयोगाने २०२० ते २०२५ या कालावधीसाठी दरनिश्चिती आदेश ३० मार्च, २०२० रोजी जाहीर केले. या आदेशानुसार सर्व प्रकारच्या वसतिगृहांना सार्वजनिक सेवा, शासकीय अथवा सार्वजनिक सेवा, अन्य या वर्गवारीनुसार वीजदर आकारणी १ एप्रिलपासून सुरू होणे आवश्यक होते. वसतिगृहे, खासगी शाळा व महाविद्यालये यांच्याशी संलग्न विद्यार्थी वसतिगृहांबाबत आदेशात त्रुटी असल्याने अजूनही लघुदाब घरगुती या जादा वीजदराने आकारणी सुरू आहे. या त्रुटी दूर करून योग्य आकारणी लागू करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.

‘सवलत लागू झाली नसल्यास हरकत नोंदवा’सर्व वसतिगृहांना सार्वजनिक सेवा शासकीय किंवा सार्वजनिक सेवा अन्य या वर्गवारीनुसार वीजदर आकारणी सुरू केली, असा दावा महावितरणने केला. परंतु लघुदाब घरगुती वीजदराने आकारणी होत आहे. अशी माहिती व पुरावे आयोगासमोर दाखल करणे आवश्यक आहे. त्यासाठी सवलतीचा दर लागू झालेला नसल्यास हरकत नोंद करावी, असे स्पष्ट केले. या वर्गवारीमध्ये शाळा व महाविद्यालयांशी संलग्न सर्व वसतिगृहे, संलग्न नसलेली अन्य विद्यार्थी वसतिगृहे, कर्मचारी पुरुष, महिला, निराधार अनाथ व दिव्यांग वसतिगृहे, मनोरुग्ण व बाल सुधारगृहे, धर्मशाळा, निर्वासित, आपदग्रस्त छावण्या व अनाथाश्रम वसतिगृहांचा समावेश आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र