शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

शिवसेनेचे ठाणे

By admin | Updated: June 19, 2015 04:44 IST

१९ जून १९६६. महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देणारी ही तारीख. प्रत्येक शिवसैनिकासाठी त्याच्या जन्मतारखेइतकीच महत्त्वाची असलेली ही तारीख.

- एकनाथ शिंदे

१९ जून १९६६. महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण देणारी ही तारीख.प्रत्येक शिवसैनिकासाठी त्याच्या जन्मतारखेइतकीच महत्त्वाची असलेली ही तारीख.नव्याने पेटून उठलेल्या मराठी अस्मितेच्या हुंकाराची द्वाही अवघ्या आसमंतात फिरवणारी ही तारीख. १०६ हुतात्म्यांचं रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईत, महाराष्ट्राच्या या राजधानीतच मराठी माणसाची होत असलेली गळचेपी पाहून दादरच्या एका व्यंगचित्रकार तरुणाचं रक्त सळसळलं, मन पेटून उठलं. मराठी माणसाची ही त्याच्याच घरात होणारी गळचेपी दूर करण्यासाठी काहीतरी करण्याच्या विचाराने तो झपाटून उठला आणि त्यातूनच जन्माला आला शिवसेना नावाचा झंझावात!!या झंझावातात भलेथोरले वृक्ष उन्मळून पडले, प्रस्थापित पाचोळ्यासारखे उडून गेले, महाराष्ट्रातल्या पारंपरिक राजकारणाची शैली बदलून गेली. नव्या, आक्रमक आणि मुख्य म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड राजकारणाची शैली शिवसेनेने आपल्या जन्मापासूनच रूढ केली.महाराष्ट्रातला तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे आकर्षित होण्याचं ते एक प्रमुख कारण होतं. जागच्या जागी मिळणारा न्याय! वस्तीत पाण्याचा नळ बसवणं असो, नोकरीच्या ठिकाणी डावललं जाणं असो किंवा शाळेची अ‍ॅडमिशन असो, दैनंदिन आयुष्यातील या समस्यांनी सामान्य मराठी माणूस मेटाकुटीला आला होता. तेव्हाचे सत्ताधीश स्वत:च्याच मस्तीत सामान्य जनतेला विसरून गेले होते. त्यामुळेच शिवसेनेच्या शाखाशाखांवर सामान्य जनता गर्दी करू लागली आणि इथे चुटकीसरशी समस्या सुटतात, हे लक्षात आल्यानंतर या गर्दीत भरच पडू लागली.शिवसेनेने नेहमीच तरुणांना विधायक कार्यक्रम दिला आहे. मराठी तरुणांमधील उद्यमशीलता वाढीस लागावी, असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सुरुवातीपासून आग्रह होता. शिवसेनेने मराठी तरुणांना केवळ वडापाव दिला, असं म्हणून हिणवणारे बरेच आहेत. पण वडापाव हे केवळ प्रतीक आहे. मराठी तरुणांनी नोकरीची बंधनं झुगारून उद्योगांमध्ये उतरावं, त्यासाठी वाट्टेल तितकी मेहनत करावी, हे त्यामागील खरं मर्म होतं. त्याचवेळी प्रत्येकाला उद्योग करणं शक्य नाही, हे जाणून चाकरमान्यांचे हित जपण्यासाठी, त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आणि मुंबई आणि महाराष्ट्रातल्या नोकरीत स्थानिक मराठी जनतेला हक्काचे स्थान मिळालेच पाहिजे, यासाठी ‘स्थानीय लोकाधिकार समिती’च्या माध्यमातून शिवसेनेनं इथल्या मराठी जनतेला न्याय मिळवून दिला.‘स्थानीय लोकाधिकार समिती’ असो वा सध्या कामगारांच्या प्रश्नांसाठी झुंजणारी ‘भारतीय कामगार सेना’, शिवसेनेनं नेहमीच सामान्य मराठी माणसाच्या हितासाठी कडवट भूमिका घेतली आहे.‘८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून दिलेला मंत्र आजही शिवसैनिक प्राणपणाने जपतात. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही हाच वारसा पुढे चालू ठेवला आहे. हाच मंत्र घेऊन शिवसेना वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्रात पसरली. त्यातला ‘ठाणे’ हा शिवसेनेच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा. शिवसेनेला सत्तेचा पहिला मान ठाण्यानेच दिला.

(लेखक सार्वजनिक बांधकाम मंत्री (सा. उ.) आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत)