शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या दहा जणांचे ‘एबी’ फॉर्म झाले रद्द

By admin | Updated: February 7, 2017 01:32 IST

महापालिकेच्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी घोषित करण्याचा आणि त्यानंतर एबी फॉर्म वाटपाचा फटका शिवसेनेला बसला असून, दहा उमेदवारांचे एबी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द

नाशिक : महापालिकेच्या निवडणुकीत ऐनवेळी उमेदवारी घोषित करण्याचा आणि त्यानंतर एबी फॉर्म वाटपाचा फटका शिवसेनेला बसला असून, दहा उमेदवारांचे एबी फॉर्म निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द ठरविल्याने त्यांना अपक्ष लढण्याची वेळ आली आहे. तथापि, शिवसेनेने त्यांना आता पुरस्कृत करण्याचा निर्णय घेतला असून, तशी माहिती पक्षाचे सचिव अनिल देसाई यांनी सोमवारी दिली. दरम्यान, उमेदवारी वाटपाचा आणि एबी फॉर्म देण्याच्या घोळाला त्यांनी तांत्रिक दोष संबोधून या प्रकाराची चौकशी करण्याचे टाळले.महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने मुंबईहून मुखपत्रात यादी जाहीर केली जाते आणि त्यानंतर एबी फॉर्म दिले जातात, अशी पद्धत असताना यंदा शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी घोळात ठेवण्यात आली आणि अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच ३ फेबु्रवारीला यादी घोषित करण्यात आली. त्यानंतर एबी फॉर्मचे वाटप सुरू असताना अनेक घोळ झाले. काही ठिकाणी वेळेत अर्ज पोहोचले नाहीत, तर काही ठिकाणी झेरॉक्स फॉर्म देण्यात आले. सिडकोतील एका प्रभागात तर चार उमेदवार आणि प्रत्यक्षात शिवसेनेचे आठ एबी फॉर्म देण्यात आले. या घोळानंतर पंचवटीमधील प्रभाग ४मध्ये शिवसेनेच्या उमेदवारांनी कोरे एबी फॉर्म दिले होते. छाननीत ते बाद करण्यात आले. त्यानंतर प्रभाग क्रमांक ३०मध्ये मूळ एबी फॉर्म न जोडता झेरॉक्स जोडण्यात आले होते. तर सिडकोत प्रभाग २९मध्ये चार उमेदवार असताना सात उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. त्या वेळी प्रथम उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निकषावर दीपक बडगुजर, भूषण देवरे, रत्नमाला राणे, सुमन सोनवणे हे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार तसेच विद्यमान नगरसेवक अ‍ॅड. अरविंद शेळके, सतीश खैरनार, माधुरी खैरनार यांचे एबी फॉर्म बाद ठरविण्यात आले. या घोळाची चौकशी करण्यासाठी अनिल देसाई नाशिकमध्ये आले होते. घोळ झाल्याचे त्यांनी मान्य केले.हे आहेत पुरस्कृत उमेदवारप्रभाग ४मध्ये भगवान भोगे, सविता बडवे, प्रतिभा घोलप, वर्षा गीते, तर प्रभाग ३०मध्ये संजय चव्हाण, नीलेश चव्हाण, शकुंतला खोडे, रशिदा शेख यांच्या उमेदवारी अर्जासमवेतचे अर्ज बाद ठरल्याने त्यांना पुरस्कृत करण्यात आले आहे. प्रभाग २९मध्ये शिवसेनेने डबल एबी फॉर्म दिल्याने घोळ निर्माण झाला होता. मात्र, त्यातही आता शिवसेनेचे देसाई यांनी मनसेचे विद्यमान नगरसेवक अ‍ॅड. अरविंद शेळके आणि सतीश खैरनार यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली. या प्रभागात शिवसेनेचे एबी फॉर्म असलेले अन्य उमेदवार २९मध्ये दीपक बडगुजर आणि भूषण देवरे हे माघार घेणार आहेत, असेही देसाई यांनी स्पष्ट केले.