रत्नागिरी : आजच्या कोकण दौ:यात मी जैतापूरला जाणार नसलो तरी त्याचा कोणीही गैरअर्थ काढू नये. जैतापूर प्रकल्पविरोधी आंदोलन तापलेले असताना आपण अनेकदा तेथे गेलो होतो. त्यामुळे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधातील शिवसेनेची भूमिका ठाम आहे व यापुढेही ती कायम राहील, त्याबाबत कोणीही संशय बाळगण्याचे कारण नाही. जनतेला दिलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मालगुंड येथे दिली.
राज्यव्यापी दौ:याची सुरुवात ठाकरे यांनी गणपतीपुळे येथून केली. त्यांच्या दौ:यात किनारपट्टीवरील अनेक ठिकाणांचा समावेश असताना वादग्रस्त अणुऊर्जा प्रकल्प असलेल्या जैतापूर भेटीचा समावेश नसल्याने अनेक तर्कवितर्क लढविले जात होते. याबाबत शिवसेनेची भूमिका बदलली काय, असा संशयही निर्माण झाला होता. मात्र, ठाकरे यांनी
या चर्चेला पूर्णविराम देत आपली भूमिका ठाम असल्याचे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)