शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने फोडले निवडणूक यंत्रणेवर खापर, भाजपाला केले टार्गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 06:07 IST

पालघर पोटनिवडणुकीत साडेआठ लाख मतदारांपैकी सहा लाख मतदारांनी भाजपाला नाकारले.

मुंबई : पालघर पोटनिवडणुकीत साडेआठ लाख मतदारांपैकी सहा लाख मतदारांनी भाजपाला नाकारले. मतदान यंत्रांमधील गडबडींमुळे भाजपाला विजय मिळाला, या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टार्गेट तर केले पण शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडण्याबाबत मात्र त्यांनी मौन बाळगले.निकालानंतर आयोजित पत्रपरिषदेत ठाकरे यांनी पालघरच्या निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित करून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची नि:पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. ते म्हणाले, भाजपा उमेदवार राजेंद्र गावित यांनी मागणी करताच मतदानाची वेळ वाढवून देण्यात आली होती. जिल्हाधिकाºयांनी मतदानाची अंतिम आकडेवारी त्यांच्या सहीने जारी केल्यानंतर लाखभर मतदान कसे वाढले याची चौकशी झाली पाहिजे. शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार का, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. मी आज जे मुद्दे मांडत आहे ते अधिक गंभीर आहेत आणि ते जनतेपर्यंत पोहोचले पाहिजेत, असे सांगत त्यांनी विषयाला बगल दिली.निवडणूक अधिकारी सरकारचे बाहुले बनून काम करणार असतील तर क्रिकेटमध्ये अंपायर जसे बाहेरून बोलावतात तसे निवडणूक निरीक्षकही बाहेरून बोलावण्याची वेळ आली आहे. मतदानादरम्यानचे घोळ असेच वाढले तर लोकांचा लोकशाहीवर विश्वासच राहणार नाही, असे ठाकरे म्हणाले. लोकशाहीची थोडी बूज असेल तर निवडणूक आयोग पालघरमधील निवडणूक प्रक्रियेची चौकशी करेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.शिवसेनेने पालघरमधील जागा निसटत्या मतांनी गमावली. चार-पाच तगडे उमेदवार असल्याने भाजपाचे जमले. खरेतर, हा भाजपाचा विजयच नाही, असे सांगून ठाकरे म्हणाले, अलीकडे भाजपा ज्या पद्धतीने वागत आणि बोलत आहे त्यावरून त्यांना मित्रपक्षांची गरज राहिलेली दिसत नाही.पालघरमध्ये वनगा परिवाराला न्याय देण्यासाठी आम्ही लढलो. निवडणुकीच्या काळात पालघरवासीयांना जी आश्वासने शिवसेनेने दिली ती पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध राहू, असेही ते म्हणाले.