शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

शिवसेनेने नाकारले; भाजपाने स्वीकारले

By admin | Updated: January 19, 2017 02:14 IST

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या माजी खासदार गजानन बाबर मनसेमार्गे बुधवारी भाजपात दाखल झाले आहेत.

पिंपरी : तीन वेळा नगरसेवक, दोन वेळा आमदार, एकदा खासदारपद मिळूनही पक्षश्रेष्ठींवर गंभीर आरोप करून शिवसेनेतून बाहेर पडलेल्या माजी खासदार गजानन बाबर मनसेमार्गे बुधवारी भाजपात दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेने नाकारले आणि भाजपाने स्वीकारले, अशी चर्चा शहरातील राजकीय वर्तुळात आहे.शहरात शिवसेनेची पहिली शाखा सुरू करण्यापासून बाबर यांना तीन वेळेस नगरसेवक, दोन वेळा आमदारकी, एकवेळा खासदारकीची संधी मिळाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील गटबाजीमुळे दोन्ही वेळा हवेली विधानसभेवर आमदारकीची संधी मिळाली. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर शहराला तीन विधानसभा मतदारसंघ मिळाले, तर मावळ आणि शिरूर असे दोन लोकसभा मतदारसंघ मिळाले. २००९च्या लोकसभा निवडणुकीत ते मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार झाले. त्या वेळी माजी महापौर आझम पानसरे यांना राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी असताना चिंचवड विधानसभा मतदारसंघातून अकबरऐवजी बाबर असा प्रचार केला आणि बाबर विजयी झाले. पुढे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी शिवसेनेकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, खासदारकीच्या वेळी आमदार जगताप यांनी त्यांना केलेल्या मदतीची परतफेड करण्याच्या उद्देशाने उमेदवारी मागितल्याचे शिवसेनाप्रमुखांच्या लक्षात आल्याने श्रीरंग बारणे यांना उमेदवारी मिळाली. त्या वेळी बाबर यांनी, पैसे देऊन उमेदवारी दिली. पैसे नसल्याने मला उमेदवारी नाकारली, असा आरोप पक्षनेते उद्धव ठाकरे यांच्यावर केला होता. शिवसेना सोडल्यानंतर पूर्वनियोजितपणे आमदार जगताप यांना पाठिंबा देत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत समर्थकांसह मनसेत जाहीर प्रवेश केला होता. लोकसभेनंतर बाबर दोन वर्षे शांत राहिले होते. (प्रतिनिधी)>विरोधक आले एकत्रहवेली विधानसभेच्या एका निवडणुकीत पानसरे आणि बाबर एकमेकांविरोधात होते. त्यानंतर २००९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा दोघे समोरासमोर आले होते. दोन्ही वेळेस राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीतील दुहीचा फटका पानसरे यांना बसला.>भाऊ, पुतणे शिवसेनेतच शिवसेना सोडल्यानंतर शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे बाबरांनी स्वगृही परतण्याची मानसिकता केली होती. नेते अनिल देसाई यांनी बाबर यांच्याशी चर्चाही केली होती. मात्र, स्थानिक पातळीवरील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमुळे त्यांना प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळेच भाजपाचा मार्ग स्वीकारल्याचे बाबर यांचे म्हणणे आहे. बाबर भाजपात गेले असले, तरी त्यांचे बंधू, माजी नगरसेवक प्रकाश आणि मधुकर बाबर, तसेच भावजय शारदा बाबर, पुतणे योगेश बाबर हे शिवसेनेतच आहेत.