शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने धुडकावला युतीचा प्रस्ताव, भाजपाचाही घेतला समाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 06:28 IST

बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे युतीबाबत सकारात्मक संकेत देणाऱ्या भाजपा नेत्यांना शिवसेनेने चांगलेच फटकारले आहे. ‘शिवसेनेचा वाघ हा पिंज-यातील वाघ नसल्याने तो राज्याच्या व राष्ट्राच्या प्रश्नांवर गर्जना करीत आहे. वाघाला रोखणे किंवा गोंजारणे आता शक्य नाही,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातून भाजपाचा समाचार घेतला आहे.

मुंबई : बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे युतीबाबत सकारात्मक संकेत देणाऱ्या भाजपा नेत्यांना शिवसेनेने चांगलेच फटकारले आहे. ‘शिवसेनेचा वाघ हा पिंज-यातील वाघ नसल्याने तो राज्याच्या व राष्ट्राच्या प्रश्नांवर गर्जना करीत आहे. वाघाला रोखणे किंवा गोंजारणे आता शक्य नाही,’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुखपत्रातून भाजपाचा समाचार घेतला आहे.भाजपाचे बिनपंखाचे विमान अजून उडतेच आहे. २०१९ चे चित्र पूर्ण वेगळे असेल, पण भाजपा अजूनही २०१४ च्या सुवर्णकाळात रमून बसला आहे, असे सांगतानाच भाजपाला मित्रांची गरज नाही. ते मजबूत व स्वयंभू आहेत, असा चिमटाही या मुखपत्रातून काढला आहे. शिवसेनेने सोबत असावे असे त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी उडत उडत सांगितले आहे. हा सद्विचार त्यांना २०१४ साली सुचला नाही व सत्ता मिळाल्यावरही ते विनय हरवून बसले. त्यांचे बिनपंखांचे विमान ढगात उडाले ते उडतेच आहे. आता उतरवायचे म्हटले तर त्यासाठी जमीन नाही. सुवर्णकाळातील सुवर्ण कौले फुलपूर-गोरखपूरमधून उडून गेल्यावर काही गोष्टी सुचू लागल्या. भाजपाने सुवर्णकाळाचे स्वप्न पाहावे. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असा टोमणाही ठाकरे यांनी भाजपाला मारला. मुंबईतील मेळाव्यात अमित शहांनी म्हटले होते की, भाजपाचे विरोधक हे साप, मुंगूस, कुत्री, मांजरी आहेत. एकमेकांशी वैर असलेले हे प्राणी मोदी महापुरात निभाव लागणार नाही म्हणून एकत्र आले. ‘यूपीए’ सरकारच्या काळातही यातले काही साप, कुत्री, मांजरी काँग्रेसबरोबर होते व मोदी लाट दिसताच यापैकी काही प्राणी भाजपाच्या तंबूत शिरले. त्यापैकी एक तेलगू देसम नुकताच बाहेर पडला आहे, अशी आठवणही अग्रलेखातून करून देण्यात आली आहे.>सत्ताधाºयांचा श्रीमंती थाटभाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईतील महामेळाव्यावरील खर्चावरही ‘सामना’तून टीका करण्यात आली. भाजपाच्या सुवर्णकाळासाठी कामाला लागा, असे आवाहन त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले आहे. अध्यक्ष महोदयांनी विचारांचे भस्म उधळले आहे. सत्ताधाºयांना साजेशा श्रीमंती थाटात भाजपाचा स्थापना दिवस झाला. राज्यात व केंद्रात सरकारे असल्याने हे होणारच, असे सांगतानाच यापूर्वी काँग्रेसची मुंबईतील अधिवेशनेही याच थाटात व्हायची, असेही या अग्रलेखातून भाजपाला सुनावण्यात आले.