शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शिवसेना पदाधिकारी भाजपामध्ये दाखल

By admin | Updated: September 18, 2016 00:54 IST

जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय गायकवाड, माजी विभागप्रमुख तुषार हिंगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी रात्री भाजपामध्ये प्रवेश केला.

पिंपरी : शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय गायकवाड, माजी विभागप्रमुख तुषार हिंगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी रात्री भाजपामध्ये प्रवेश केला. या वेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष हर्षल ढोरे व काँग्रेसच्या नगरसेविका जयश्री गावडे यांचे पती वसंत गावडे यांचेही भाजपात स्वागत करण्यात आले. त्यामुळे शहरात भाजपाकडून तोडफोडीचे राजकारण सुरू झाल्याची चर्चा आहे. आगामी महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी रात्री पुण्यात बैठक झाली. ही बैठक संपल्यानंतर पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम करण्यात आला. या वेळी दत्तात्रय गायकवाड, तुषार हिंगे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांनी दोघांचेही पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. या वेळी भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार, शहर सरचिटणीस सारंग कामतेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.दत्तात्रय गायकवाड यांनी दिघी गावचे सरपंचपद, जिल्हा परिषदेचे सदस्यपद, तसेच शिवसेनेचे नगरसेवकपद आणि गटनेतेपद सांभाळले आहे. २००२मध्ये प्रभाग पद्धतीने झालेल्या महापालिका निवडणुकीत त्यांनी दिघी भागातून शिवसेनेचे पॅनेल निवडून आणले होते. त्यामुळे त्यांना महापालिकेत शिवसेनेचे गटनेतेपद देण्यात आले होते. शिवसेनेचे माजी विभागप्रमुख तुषार हिंगे यांनी २०१२मध्ये मोरवाडी प्रभाग क्रमांक २७मध्ये महापालिका निवडणूक लढविली होती. (प्रतिनिधी)>फूट : राष्ट्रवादी, काँग्रेस पदाधिकाऱ्यांचेही स्वागत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष हर्षल ढोरे आणि काँग्रेसच्या नगरसेविका जयश्री गावडे यांचे पती वसंत गावडे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. हे दोन्ही पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील बैठकीला उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ढोरे आणि गावडे यांचेही पुष्पगुच्छ पक्षात स्वागत करण्यात आले.