शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जुंपली! हरवल्याशिवाय दाढी काढणार नाही असं म्हणणाऱ्या राणेंना विनायक राऊतांचं प्रतिआव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 17:33 IST

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा करणा-या राणेंना विनायक राऊत यांनी प्रतिआव्हान दिलं आहे.

सिंधुदुर्ग, दि. 19 - शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा पराभव केल्याशिवाय दाढी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा माजी खासदार निलेश राणेंनी कुडाळमधील सभेत घेतली होती. निलेश राणेंच्या या वक्तव्यावर विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

निलेश राणे यांचं आव्हान स्वीकारतो, त्यांना अडीच लाख मतांनी पराभूत करु, असं म्हणत राऊतांनी प्रतिआव्हान दिलं आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत विनायक राऊत यांनीच निलेश राणे यांचा पराभव केला होता. त्यावेळी या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले चढवले होते. 

काय म्हणाले विनायक राऊत - मी उमेदवार असो वा अन्य कोणी पण निलेश राणे यांना अडीच लाखांहून अधिक मतांनी पराभूत करणारच, असं विनायक राऊत यांनी ठणकावलंय.

नारायण राणे ब्रम्हराक्षस - नारायण राणे ब्रम्हराक्षस आहे तो कधी भाजपात जातो याची आम्ही वाटच पाहात आहोत. नारायण राणे यांचं शक्तीप्रदर्शन नव्हतं तर ते  केविलवाणं दर्शन होतं, अशा शब्दात राणेंवर राऊत यांनी टीका केली. 

मला शिवसेनेकडून ऑफर, पण जाणार नाही; नारायण राणेंचा खुलासा-

कर्तृत्व असणा-याला काँग्रेस साथ देत नाही. त्यामुळे काँग्रेसला भविष्य नाही, अशी टीका करत 21 सप्टेंबरला घटस्थापनेदिवशी पुढील निर्णय जाहीर करू, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोमवारी केली. येत्या 21 सप्टेंबरला घटनस्थापनेच्या मुहूर्ताला आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबत ते घोषणा करणार आहेत.शिवसेनेकडून मला ऑफर, पण जाणार नाही -

‘मला शिवसेनेकडून ऑफर होती. त्यांच्यातील काही जणांनी मला त्यांच्या नेत्यांशी थेट बोलणी करण्यास सांगितलंही होतं. पण मी सुरुवातीलाच त्या गोष्टीला नकार दिला. मी स्पष्ट शब्दात  सांगितलं की, मला शिवसेनेत यायचं नाही.’ सिंधुदुर्गात झालेल्या सभेनंतर राणेंनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेनेकडून मला ऑफर असल्याचा खुलासा केला आहे. शिवसेनेकडून ऑफर होती पण त्या गोष्टीला नकार दिला असं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी बोलताना त्यांनी प्रत्येक पक्षात माझ्यासाठी जागा असल्याचं म्हटलं. सिंधुदुर्गात शक्तीप्रदर्शन केलं नाही तर तो लोकांचा, कार्यकर्त्यांचा उत्स्फुर्तपणा होता असंही म्हणाले. त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही अकार्यक्षम असल्याचा ठपका ठेवला.  भाजपामध्ये जाणार की पक्ष काढणार?राणे यांनी अजून आपले पत्ते उघड केलेले नाहीत. घटस्थापनेदिवशी ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. पण तो निर्णय काँग्रेस सोडण्याचा, भाजपात जाण्याचा की, नवा पक्ष काढण्याचा असेल? याविषयी उत्सुकता आहे. राणे यांचा तूर्त भाजपाप्रवेश होणार नाही. दिवाळीपर्यंत ते ‘बाहेर’ राहून काँग्रेसमधून कोण-कोण सोबत येतात, याची चाचपणी करतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.31 जिल्हे पाठीशी -घटस्थापनेदिवशी मी माझा निर्णय जाहीर करणार, त्या वेळी कोण कोणाला धक्का देतो ते पाहू. महाराष्ट्राच्या जनतेच्या आणि कोकणी जनतेच्या भल्यासाठी मी आणि माझे दोन्ही पुत्र राजकारणात आहोत. राज्यातील ३१ जिल्हे माझ्या पाठीशी आहेत, असा दावाही राणे यांनी केला.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत Nilesh Raneनिलेश राणे Narayan Raneनारायण राणे