शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या यशामुळे शिवसेना झाकोळली

By admin | Updated: February 24, 2017 07:17 IST

मुंबईतच पक्षाच्या स्थापनेच्या मेळाव्यात बोलताना ‘सूरज निकलेगा... कमल खिलेगा’ असे उद्गार माजी पंतप्रधान

गौरीशंकर घाळे / मुंबईमुंबईतच पक्षाच्या स्थापनेच्या मेळाव्यात बोलताना ‘सूरज निकलेगा... कमल खिलेगा’ असे उद्गार माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी काढले होते. मुंबई महापालिका निवडणुकीत ८२ जागा मिळवीत भाजपाने गुरुवारी ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजयाची नोंद करत ते खरे केले. शिवसेनेच्या तोडीस तोड जागा मिळवीत आपण धाकटे नाही तर महापालिकेच्या राजकारणात आपण आता बरोबरीचे असल्याचे भाजपाने गुरुवारी सिद्ध केले.युतीच्या राजकारणात भाजपाच्या वाट्याला कायमच धाकट्या भावाची भूमिका आली. लोकसभा, विधानसभेच्या निकालानंतर आता महापालिकेच्या निकालांनी ते पूर्णपणे पुसले गेल्याची भावना भाजपा कार्यकर्त्यांमध्ये आहे. शिवसेनेने युती तुटल्याची घोषणा केल्यानंतर भाजपाने स्वबळावर मुंबईत सत्ता आणण्याचा निर्धार व्यक्त केला. एकीकडे पारदर्शक कारभार आणि मुंबईच्या विकासाचे आश्वासन द्यायचे तर दुसरीकडे महापालिकेच्या आजपर्यंतच्या गैरकारभाराचे खापर सर्वस्वी शिवसेनेवर फोडायचे, अशी दुहेरी रणनीती भाजपाने वापरली. त्याचा अपेक्षित परिणाम झाल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. मुंबईतील भाजपा नेत्यांनी वर्षभरापासूनच नालेसफाई, खड्डे या विषयांवरून शिवसेनेला टार्गेट करण्यास सुरुवात केली. मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेच्या ‘अरे ला कारे’ करत आपली भूमिका चोख पार पाडली. भाजपाचा पारंपरिक मतदार मानला जाणारा गुजराती, उत्तर भारतीय समाजावरील पकड कायम करतानाच मराठी मतदार लांब जाणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली गेली. केवळ आम्हीच पारदर्शक कारभारातून मुंबईचा विकास साधू शकतो, हे पटवून देण्यात भाजपा यशस्वी झाली. परिणामी २० वर्षांतील धाकलेपण पुसले गेले.‘आम्हीच मुंबईत नंबर वन’ निकालानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे तर आशिष शेलार यांनी थेट ‘आम्हीच मुंबईत नंबर वन’ असल्याचे म्हटले आहे. ८२ जागा घेत भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला असला तरी १९९२ नंतर प्रथमच शिवसेना वगळता अन्य कोणत्या पक्षाने इतक्या मोठ्या प्रमाणात जागा जिंकल्या आहेत? त्यामुळे मुंबई म्हणजे फक्त शिवसेना हे २५ वर्षांचे समीकरण भाजपाच्या यशाने मागे पडल्याचे चित्र आहे. शिवसेनेच्या भावनिक राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देणारा, सोयीसुविधांची अपेक्षा करणारा मराठी मतदारही भाजपाकडे वळल्याचे चित्र आहे.