मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्समध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे थीम पार्क बांधण्यासाठी वर्षभर मंत्रलयाचे उंबरठे ङिाजवणा:या शिवसेनेला आणखी एक दणका मनसेने दिला आह़े वायफाय सेवेनंतर मुंबईतील पहिले मनोरंजन थीम पार्क उभारण्यात मनसेने बाजी मारली आह़े विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या उद्यानाचा बार उडविण्यात येणार आह़े
महापालिकेच्या माध्यमातून मुंबईत वायफाय सेवा सुरू करण्याची निव्वळ घोषणाच शिवसेना काही वर्षापासून देत आह़े मात्र ही सेवा विलेपार्लेमध्ये सुरू करून मनसेने शिवसेनेला शह दिला़ त्यानंतर आता पहिले थीम पार्क उभारण्याच्या शिवसेनेच्या स्वप्नाला मनसेने सुरुंग लावला आह़े भांडुप पश्चिम येथील भांडुपेश्वर कुंड येथे हे थीम पार्क अवतरणार आह़े
हा भूखंड पर्यटनस्थळ म्हणून जाहीर करण्याची मागणी मनसेचे स्थानिक आमदार मंगेश सांगळे यांनी अनेक वर्षापासून लावून धरली होती़ पूर्व द्रुतगती मार्गाला लागून असलेल्या भांडुपेश्वर कुंड या परिसराच्या सुशोभीकरणासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय परवानगीही सांगळे यांनी मिळवल्या़ त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच या थीम पार्कचा मार्ग मोकळा झाला आह़े (प्रतिनिधी)
शहर व उपनगरात पर्यटकांनी खास यावे, मुला-बाळांसह मौजमजा करावी, असे एकही पर्यटनस्थळ नाही. मात्र ‘माझे जग’ या थीम पार्कमध्ये लहान मुलांचे तसेच त्यांच्या पालकांचे काही क्षण नक्कीच आनंदात जातील. या थीम पार्कचा विकास करताना शहरातल्या कष्टकरी वर्गाचा खासकरून विचार केला गेलाय. सर्वसामान्य कष्टक:यालाही आपल्या कुटुंबासह या थीम पार्कचा आनंद मनमुराद लुटता यावा यासाठी येथील शुल्क नाममात्र असेल.
- मंगेश सांगळे, आमदार, विक्रोळी
आचारसंहितेपूर्वी कामाचा शुभारंभ : 23 ऑगस्टला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या पार्कच्या कामाचा शुभारंभ होत आह़े या पार्कसाठी एकूण नऊ कोटी खर्च अपेक्षित आह़े पहिला टप्प्यात तीन कोटी रुपये निधी देण्यात आला असून या पार्कची देखभाल राज्य शासनामार्फत होणार आह़े दुस:या टप्प्यात तलावाचा विकास होणार आह़े वर्षभरात या पार्कचे काम पूर्ण होईल़ तसेच या पार्कमधील प्रवेश शुल्क शासनामार्फत निश्चित करण्यात येणार आह़े