शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांना मुस्लिम सरदारांचा मानाचा मुजरा

By admin | Updated: February 19, 2015 23:41 IST

शिवजयंती उत्साहात : सांगली, मिरजेत शिवप्रतिमेची मिरवणूक, कार्यक्रमांमधून एकात्मतेचा संदेश

सांगली : छत्रपती शिवरायांच्या सैन्यात असणाऱ्या निष्ठावंत मुस्लिम सैनिकांच्या वेशभूषा करून उंट, घोड्यांवर स्वार होऊन मुस्लिम बांधवांनी आज, गुरुवारी सांगली शहरातील प्रमुख मार्गावरुन वाजत-गाजत मिरवणूक काढली आणि शिवरायांना मुस्लिम सरदारांतर्फे मानाचा मुजरा करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त मुस्लिम समाजातर्फे या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले होते. सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यासही चांगला प्रतिसाद मिळाला.शिवरायांच्या सैन्यात असणाऱ्या निष्ठावंत मुस्लिम सरदारांचा इतिहास समाजासमोर यावा, या उद्देशाने प्रतिवर्षी मुस्लिम समाजातर्फे मिरवणूक काढण्यात येते. स्टेशन चौकातून दुपारी तीन वाजता स्थायी समिती सभापती संजय मेंढे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी प्रकाश गायकवाड यांच्याहस्ते मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. स्टेशन चौकातून मिरवणूक राजवाडा चौक, पटेल चौक, झाशी चौक, हरभट रोड मार्गे मारुती चौकात आली. तेथे शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बसस्थानक रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. तेथून बापट बाल प्रशाला, फौजदार गल्ली, हिराबाग कॉर्नर, बदाम चौक, नळभाग, राममंदिर मार्गे डॉ. आंबेडकर क्रीडांगणावर येऊन मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरज : मिरजेत पुरोगामी संघटनांतर्फे गुरुवारी शिवजयंती उत्सव समितीतर्फे शिवप्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत शिवरायांच्या सरदारांच्या वेशात मुस्लिम बांधव सहभागी होते. शहरातील प्रमुख मार्गावरून शिवाजी चौकात मिरवणुकीचा समारोप झाला. आ. सुरेश खाडे यांच्याहस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. माजी आमदार हाफिज धत्तुरे, शिवराज पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलास देसाई, दस्तगीर मलिदवाले, पोलीस निरीक्षक शिवाजी आवटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. हायस्कूल रोड येथून काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, अभिजित पवार यांच्याहस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीत दर्या सारंग, इब्राहिम खान, काझी हैदर, सिध्दी इब्राहिम, नूरखान बेग, दौलतखान, मदारी मेहतर, बाबा याकूब, शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे यांच्या वेशात घोडेस्वार, मावळे, बैलगाड्या, रिक्षा सहभागी होत्या. शिवछत्रपतींचा जयघोष करीत मिरवणुकीत रमेश पवार, डॉ. मन्नान शेख, महादेव कोरे, असगर शरीकमसलत, माजी आमदार शरद पाटील, डॉ. महेश कांबळे, जहिर मुजावर, डॉ. केशव नकाते, अमृतराव सूर्यवंशी, संभाजी मेंढे, प्रकाश इनामदार, बाळासाहेब पाटील, धनंजय भिसे, जैलाब शेख, दिगंबर जाधव, शकील पटेल, मुस्तफा बुजरूक, सुलेमान मुजावर, शकील काझी, सजिद पठाण, महेबूब मुश्रीफ,गौतम काटकर, महेबूब मणेर आदी मिरवणुकीत सहभागी होते. शिवजयंती उत्सव समितीने संयोजन केले.छावा युवा संघटनेतर्फे शिवजयंती साजरी करण्यात आली. सुभाषनगर येथे अंगणवाडी क्रमांक ११४ येथे विद्यार्थी, पालक, संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांतर्फे संजय चौगुले यांच्याहस्ते शिवप्रतिमेस अभिवादन करण्यात आले. तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अध्यक्ष प्रमोद इनामदार यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. कार्याध्यक्ष गंगाधर तोडकर, बाळासाहेब सूर्यवंशी, माजी सभापती भारत कुंडले, बाळासाहेब माळी, अनिल साळुंख, अनिता कदम उपस्थित होते. यावेळी शिवछत्रपतींचा इतिहास या छोट्या पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. दलित महासंघातर्फे अध्यक्ष डॉ. प्रशांत लोखंडे यांनी पुतळ्यास अभिवादन केले. (प्रतिनिधी)सांगलीत सामूहिक विवाह सोहळासांगलीच्या आझाद व्यायाम मंडळाच्या क्रीडांगणावर सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये बैजू अशोक वाघमारे (मिरज) आणि कोमल रामचंद्र जाधव (मिरज) यांचा ख्रिश्चन पध्दतीने, तर बाबासाहेब माणिक फाळके (सांगली) आणि नीता अशोक कांबळे (सांगली) यांचा शिवधर्म पध्दतीने विवाह लावण्यात आला. या वधू-वरांना मुस्लिम समाजातर्फे एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी, चांदीची अंगठी, संसारोपयोगी साहित्य भेट देण्यात आले. यावेळी असिफ बावा, उमर गवंडी, समीना खान, शहानवाज फकीर, सलीम बारगीर, रज्जाक नाईक, हारुण शिकलगार, आयुब पटेल, मुश्ताक रंगरेज, अ‍ॅड. रियाज जमादार, जब्बार बावस्कर, सुनील गवळी, बाबूभाई तांबोळी, शाहीन शेख आदींसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.मिरवणुकीने वेधले सांगलीकरांचे लक्षमिरवणुकीत ‘आम्ही शिवबाचे सरदार’ हा पोवाडा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होता. त्याचप्रमाणे मैदानी खेळांची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी मारुती चौकात नागरिकांनी गर्दी केली होती.चौका-चौकात मैदानी खेळांची प्रात्यक्षिके दाखविली जात होती. यामध्ये दांडपट्टा, तलवारीने लिंबू कापणे आदी खेळप्रकारांचा समावेश होता.मुस्लिम बांधवांनी सरदारांचा वेश परिधान केला होता. यामध्ये मदारी मेहतर, दर्या सारंग, सिध्दी मेतकरी, सिध्दी वाहवा, रुस्तूम ए जमाल, रुस्तूम ए खान आदी सरदारांचा समावेश होता. घोडे, तसेच उंटावर स्वार झालेले सरदार पाहण्यासाठी सांगलीकरांनी गर्दी केली होती. यावेळी बेंजो पथकावर देशभक्तीपर गीते सुरू होती.