शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

शिवरायांच्या जयघोषांनी रायगड दुमदुमला,  ३४५ वा शिवराजाभिषेक उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 18:18 IST

शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय होते. त्यांची नीतिमत्ता, राजकारभाराच्या नीतिवर राज्य सरकारने अमल करण्याची गरज आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी केले. यावेळी मराठा आरक्षण दिले पाहिजे, असेही आवाहन संभाजीराजे यांनी केले. 

ठळक मुद्देशिवरायांच्या जयघोषांनी रायगड दुमदुमला,  ३४५ वा शिवराजाभिषेक उत्साहात शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय ः संभाजीराजे

 डॉ. प्रकाश मुंज

रायगड ः शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय होते. त्यांची नीतिमत्ता, राजकारभाराच्या नीतिवर राज्य सरकारने अमल करण्याची गरज आहे, असे खासदार संभाजीराजे यांनी केले. यावेळी मराठा आरक्षण दिले पाहिजे, असेही आवाहन संभाजीराजे यांनी केले. शिवरायांच्या जयघोषांतअखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने  ३४५ वा राज्याभिषेक सोहळा गुरुवारी रायगड येथे पार पडला. यावेळी हजारों शिवप्रेमीच्या उपस्थितीत खासदार संभाजीराजेनी राजसदरेवरून शिवप्रेमींना संबोधित केले.

संभाजीराजे म्हणाले. रायगडावर पाण्याचे योग्य नियोजन केले जाईल. येथे १०० टक्के पाणीव्यवस्था केली जाईल. शिल्लक पाणी रायगड परिसरातील २१ गावांना देण्यात येईल. आतापर्यंत गडकिल्ल्यांसाठी काम करत आहे, इथून पुढे शेतकऱ्यांसाठी, बहुजनांसाठी काम करेन. गड-किल्ल्यांचे बिझनेस माँडेल बनविले आहे, ते केंद्र शासनाला सादर केले जाईल. शासनास विनंती आहे की बुलेट ट्रेन प्रमाणेच या प्रस्तावास भरघोस निधी द्यावी व किल्ले संवर्धन हे स्वतंत्र मंत्री खाते म्हणून मंजुरी द्यावी.यावेळी चीनचे राजदूत लीयू बिन्ग, पोलंडचे राजदूत दमियन इरज्याक, सचिव इवा स्टेन्किइव्हीक्झ, तुनिसियाचे राजदूत नेज्मेद्दिन लखाल, बुलग्रीयाचे राजदूत इलेनोरा दिम्तीवा, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी अनिल पारस्कर, तहसीलदार चंद्रसेन पवार, कोल्हापुरचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख उपस्थित होते.यावेळी चीनचे राजदूत लीयू बिन्ग म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे नव्हे तर चीनचेही आदर्श आहेत. या कार्यक्रमासाठी इतिहास संशोधक, अभ्यासक, शिवभक्त, इतिहास प्रेमी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

सोहळ्याला रयतेचे प्रातिनिधिक स्वरूपात उस्मानाबादमधील मेडशिंगा येथील आत्महत्या केलेल्या अवचट या शेतक-यांच्या कुटूंबाला उपस्थित राहण्याची संधी दिली. या  शेतक-यांच्या कुटूंबियाच्या हस्ते पूजन झाले. त्यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला. सात वाजता ध्वज पूजन व ध्वजारोहण झाले. यानंतर शाहिर रंगराव रंगराव पाटिल, आझाद नायकवडी यांनी शाहिरी गायिली. साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. यानंतर खासदार संभाजीराजे व शहाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.

यानंतर मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांना सुवर्ण नाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा शिवराज्याभिषेक मुख्य पालखी सोहळा शिवमय वातावरणात पार पडला. जगदीश्वराचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याचा समारोप झाला.  

यावेळी खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते समाधीस्थळ पुष्पहार अर्पण करण्यात आले. इचलकरंजीतून पन्नास गाड्या मधून १२०० शिवप्रेमी रायगडावर उपस्थित होते. याचे नियोजन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले होते. तेही यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Shivrajyabhishekशिवराज्याभिषेकRaigadरायगडkolhapurकोल्हापूरSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती