शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीचा अंगार! अन् अवघ्या काही क्षणात पुन्हा अवतरले छत्रपती संभाजी; पाहा ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याचा पडद्यामागचा थरार…

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 09:13 IST

बाळ इथं निजला, शिवाचा बाळ इथं निजला…पुढे फक्त २ मिनिटांचा वेळ अन् छत्रपती शंभूराजे पुन्हा रंगमंचावर…अंगावर शहारे आणणारा Video

शिवपुत्र संभाजी महानाट्यातील अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सध्या हे महानाट्य औरंगाबादमध्ये सुरु आहे. या नाट्यातील शेवटच्या प्रसंगाचा एक पडद्यामागचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ बघून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 

स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र संभाजी महाराज यांच्यावर हे महानाट्य आधारित आहे. 'शिवपुत्र संभाजी हे महानाट्य संपत असताना संभाजी यांच्या बलिदानानंतर अवघ्या काही वेळात पूर्ण भरजरी पेहरावातले शंभूराजे पुन्हा प्रेक्षकांसमोर येतात. बाळ इथे निजला, शिवाचा बाळ इथे निजला हे गाणे सुरु असते, प्रेक्षक भावूक झाले असताना पडद्यामागे वेगळी गडबड सुरु असते.  सर्व लहान मुलांच्या पुढील पिढीच्या नजरेत हे राजबिंडे छत्रपती संभाजी महाराजच राहिले पाहिजेत' त्यासाठी हा व्हिडिओ मुद्दाम केल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीराजे यांच्या बलिदानानंतर अमोल कोल्हे पडद्यामागे जातात. आधीचा रक्तबंबाळ अवस्थेतील पेहराव काढून त्यांची टीम लगेच त्यांना पुन्हा शंभुराजांचा पेहराव देते, मेकअप केला जातो, दागिने घातले जातात आणि अमोल कोल्हे पुन्हा घोड्यावर बसून प्रेक्षकांसमोर येतात. हे सर्व अवघ्या २ मिनिटांत साकारले जाते जे बघून सर्वांच्या अंगावर काटा येईल हे नक्की. पुढच्या पिढीला स्वराज्याचा हा धगधगता इतिहास कळावा यासाठी हा प्रयत्न खरंच कौतुकास्पद आहे.

शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग सध्या २३ ते २८ डिसेंबर औरंगाबाद येथे सुरु आहे. तर येत्या २१ जानेवारी पासून नाशिक मध्ये या महानाट्याचा थरार रंगणार आहे.

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीMarathi Actorमराठी अभिनेता